या विश्वात प्रत्येक जीवाची एक वेगळी स्पेस असते. जसे प्राणी जंगलात राहतात तसे मनुष्य शहरात राहतात. आपण प्रत्येकाच्या स्पेसचा सन्मान करायला हवा. खासकरून नात्यांमध्येही हे पाहिलं जातं. एका घरात साप शिरला होता, तिथे एक महिला होती. सामान्यपणे साप दिसला की, लोक घाबरतात. तो जर फणा काढलेला असेल तर मग विचारायलाच नको. मात्र ही महिला घाबरली नाही. उलट तिने जे सापासोबत केलं ते सर्वांनी बघायला हवं.
घरात साप शिरल्यावर महिलेने न घाबरता मोठ्या प्रेमाने सापाला एका काठीच्या मदतीने घराबाहेर काढलं. सापही आरामात घराबाहेर निघून गेला. या दरम्यान तो महिला फणा वर करून बघत असतो. त्याला वाटलं असेल महिला त्याला मारेल पण ती त्याला मारत नाही. त्याला आरामात बाहेर काढते आणि सापही तेथून आरामात निघून जातो.
आएएस सुप्रिया साहू यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं की, त्यांना नाही माहीत की, ही महिला कोण आहे. पण ती या सापाला ३ सी प्रमाणे हॅंडल करत आहे. कूल, काल्म आणि कॉलेक्टेड. त्यांनी पुढे लिहिलं की आपल्याला आणखी अशा लोकांची गरज आहे. जे वाइल्डलाइफचा सन्मान करतात. अनेकांनी कमेंट्स करून महिलेचं कौतुक केलं आहे. काही लोकांनी सांगितलं की, हा तर कोब्रा साप होता. हा जगातल्या सर्वात खतरनाक सापांपैकी एक आहे.