Viral Photo : असं म्हणतात की, मनुष्यांची नजर फारच तीक्ष्ण असते. आपल्या नजरेतून काहीच लपू शकत नाही. नजरेच्या बाबतीत गरूडाला सर्वात जास्त मानलं जातं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, गरूड मनुष्यांपेक्षा आठ पटीने अधिक चांगलं बघू शकतात. ते ५०० फूट दूर अंतराहूनही आपली शिकार बघू शकतात.
मनुष्यांची नजर कितीही चांगली असली तरी कधीना कधी असं काहीतरी सुटूनच जातं. कधी कधी तर समोर असलेली वस्तूही पटकन दिसत नाही. पण याचा अर्थ असा नाही की, त्यांची नजर कमजोर आहे. अनेकदा डोक्यात वेगळे विचार सुरू असल्याने समोर असलेलीच वस्तू सहजपणे दिसत नाही.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात एका सापाला शोधण्यासाठी लोकांना फारच मेहनत घ्यावी लागत आहे. हा फोटो पाहिल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. पण सापाला शोधणं इतकंही सोपं काम नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची नजर तीक्ष्ण आहे तर या फोटोतील साप शोधू शकता.
दरम्यान हा फोटो गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून व्हायरल होत आहे. पण यातील साप शोधणं प्रत्येकाला जमलंच असं नाही. लोकांना खूप वेळ घालवूनही किंवा खूप मेहनत घेऊनही साप काही दिसत नाहीये. पण तुम्ही फोटोवर नजर मारून सापाला शोधू शकता.