सापाचं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो. सापाचे व्हिडीओ किंवा फोटो पाहायला बरे वाटतात पण प्रत्यक्षात जेव्हा साप समोर येण्याचा विचार जरी केला तरी थरकाप उडतो. अमेरिकेच्या कॉलोराडोमध्ये एक असं कुटूंब राहतं. ज्या कुटुंबातील सदस्य बर्फापासून नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी तयार करत असतात. २०१९ मध्ये या कुटुंबानं बर्फापासून एक सुंदर वाघ बनवला होता.
या वाघाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळाला. आता मॉन मूजली आणि तिच्या ५ भाऊ बहिणींनी मिळून १० तासांमध्ये जवळपास ७७ फूट लांब साप बनवला आहे. हा फोटो पाहून तुम्ही या माणसाच्या कलेचे चाहते झाल्याशिवाय राहणार नाही.
इंस्टाग्रामवर मेलो मॉर्ननं एक विशालकाय साप बनवण्याचे फोटो आणि व्हिडीओज शेअर केले आहेत. ६०० पेक्षा जास्त लोकांनी लोकांनी या माणसाच्या फोटोला लाईक केलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की बर्फापासून साप तयार करण्यात आला आहे.
त्यानंतर स्प्रे पेटिंगचा वापर करत शेडिंगप्रमाणे एक साप बनवला आहे. दोनवर्षांपूर्वी मॉन मुजलीनं बर्फापासून वाघ बनवला होता. त्यानंतर या कुटूंबावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आतासुद्धा त्यांनी साकारलेली कलाकृती खर्या खुऱ्या सापाप्रमाणे वाटत आहे. ९० लाखांचा फ्लॅट घेऊन चोरीसाठी खणलं भुयार; डॉक्टरांच्या घरातून 'अशी' लंपास केली कोट्यांवधींची संपत्ती