Social Media Influencer Live Sleeping Earning: सोशल मीडियाने लोकांना फक्त संवादाचं माध्यमच नाही तर त्यांना कमाईची संधीही दिली आहे. लोक आता सोशल मीडिया इंफ्लूएंसर बनून लाखो रूपयांची कमाई करत आहेत. यात त्यांना सोशल मीडियावर वेगवेगळा कंटेट द्यायचा असतो. कुणी डान्स व्हिडीओ बनवतात तर कुणी अभिनय करतं. तर काही लोक वेगवेगळे व्हिडीओ ब्लॉग तयार करतात. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, एक व्यक्ती झोपून झोपून लाखो रूपयांची कमाई करत आहे तर तुम्हाला हे वाचून जरा अजब वाटेल. पण हे सत्य आहे. आम्ही ज्या इंफ्लूएंसरबाबत सांगत आहोत तो झोपतानाचे व्हिडीओ बनवून वर्षाला तीन कोटी रूपयांची कमाई करत आहे.
झोपताना लाइव्ह बघतात फॅन्स
जॅकी बोहम ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये राहतो. तो एक वेब डेव्हलपर आहे. जॅकी बोहमचे टिकटॉकवर 19 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो रोज रात्री दहा वाजता झोपतो. या दरम्यान तो ऑनलाइन राहतो आणि त्याचे फॉलोअर्स त्याला ऑनलाइन बघत असतात. जर झोपताना एखाद्या फॅनला त्याला जागवायचं असेल तर यासाठी काही पेमेंट करावं लागतं. अशाप्रकारे जॅकी झोपता झोपता कमाई करतो.
द ऑस्ट्रेलियनच्या रिपोर्टनुसार, जॅकी ऑनलाइन असताना त्याचे फॉलोअर्स व्हर्चुअल गिफ्ट खरेदी करतात. याने जॅकीच्या कॅमेरामध्ये काही आवाज होतो आणि कॅमेराचा लाइट सुरू होतो. त्याचे फॅन्स असं करून व्हिडीओ गेमचा अनुभव घेतात. ज्यात त्यांना हवं तेव्हा ते जॅकीला जागं करू शकतात. या सिस्टीमच्या माध्यमातून जॅकी महिन्याला साधारण 28 लाख रूपये कमाई करतो.
5 मिनिटे जागवण्यासाठी 30 हजार रूपये
जॅकीच्या या सिस्टीमध्ये 5 मिनिटांसाठी लाइट सुरू होतो आणि या पाच मिनिटांसाठी त्याच्या फॅनला 30 हजार रूपये खर्च करावे लागतात. 30 हजार रूपये दिल्यावर कॅमेराची NEON रंगाची लाइट 5 मिनिटांसाठी वे ऑन करू शकतात.
जॅकी सांगतो की, तो पैसे जमा करत आहे. यातून त्याला एक चांगलं आणि मोठं घर घ्यायचं आहे. यासोबतच तो मेंटल हेल्थशी संबंधित संघटनांनाही मदत करतो. हळूहळू त्याच्या फॉलोअर्सची संख्याही वाढत आहे.