भर रस्त्यात नाचणं मॉडेलला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:22 PM2021-09-17T17:22:12+5:302021-09-17T17:22:22+5:30

इंदौरमधील एका गजबजलेल्या चौकामध्ये डान्स करणाऱ्या मध्य प्रदेशातील इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

social media influencer model shreya kalraa dance on road police take action against her | भर रस्त्यात नाचणं मॉडेलला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

भर रस्त्यात नाचणं मॉडेलला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

Next

इंदौरमधील एका गजबजलेल्या चौकामध्ये डान्स करणाऱ्या मध्य प्रदेशातीलइन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. श्रेया कालरा (Shreya Kalra) असे या मॉडेलचे नाव आहे. ही क्लिप व्हायरल होताच वाहतूक थांबवून रस्त्यावर नाचल्याबद्दल श्रेयाला नेटिझन्सनीही फटकारले होते.

श्रेया कालरा इंदौरच्या रासोमा स्क्वेअर येथील झेब्रा क्रॉसिंगवर डोजा कॅटच्या ‘वुमन’ या व्हायरल गाण्यावर नाचताना दिसली होती. इन्स्टाग्राम रीलमध्ये शेअर केलेल्या या व्हिडीओत ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर गाड्या थांबल्यानंतर श्रेया कालरा रस्त्यावर थिरकताना दिसते. तिला पाहून पादचारी आणि वाहनचालकही गोंधळलेल्या अवस्थेत होते. पब्लिक ट्रेण्डसाठी दिलेल्या डेअरचा हा भाग असल्याचं त्या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, हा ३० सेकंदांचा व्हिडिओ लाल सिग्नल असताना चित्रित करण्यात आला होता आणि रहदारीचे नियम मोडण्याचा आपला हेतू नव्हता, असे तिने स्पष्ट केले आहे. “कृपया वाहतुकीचे नियम मोडू नका. लाल सिग्नलचा अर्थ असा आहे की तुम्हाला थांबावे लागेल, मी नाचत आहे म्हणून थांबू नका आणि तुमचे मास्क घाला.” असे व्हिडीओ कॅप्शन अपडेट करत तिने लिहिले होते.

गृहमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश
श्रेयाच्या स्पष्टीकरणानंतरही मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, जे इंदौरचे पालकमंत्री देखील आहेत, यांनी अधिकाऱ्यांना तिच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीटही केले आहे, “मी ट्रॅफिक सिग्नलवर फ्लॅश मॉब करणाऱ्या मॉडेलवर नियमांनुसार कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. फ्लॅश मॉब्समागील भावना काहीही असली तरी ही पद्धत चुकीची आहे. ” असं मिश्रा म्हणाले होते. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी मोटार वाहन कायद्यांतर्गत तिच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: social media influencer model shreya kalraa dance on road police take action against her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.