सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी बाब का ढाबा हा प्रतिकुल परिस्थिती असलेल्या एका रडणाऱ्या आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दिल्लीतील 'बाबा का ढाबा' (Baba Ka Dhaba) या व्हिडीओला नेटिझन्सनी चांगलंच उचलून धरलं. त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हा सगळ्यानाच दिसला असेल. एकेकाळी बाबाच्या ढाब्यावर कोणी फिरकतही नव्हतं. अन् अचानक सोशल मीडियाच्या कमालीमुळे या आजोबांच्या ढाब्यावर खवय्यांची गर्दी झाली.
या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनाही विश्वास बसला नाही. 80 वर्षीय जोडप्याला मदत करण्यासाठी लोकांनी ढाब्यावर गर्दी केली. जे लोक ढाब्यावर जाऊ शकत नव्हते त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून या वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हात दिला आहे. यानिमित्ताने वृद्ध दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये 'बाबा का ढाबा' नावाने जेवणाचे पदार्थ बनवून एक छोटसं दुकान चालवतात. चिंताजनक! कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांवर होतंय 'या' नवीन आजाराचं आक्रमण; तज्ज्ञांचा दावा
आता झोमॅटो'ने ट्विट करत, 'बाबा का ढाबा' आता झोमॅटोवर लिस्टेड असून आमची टीम त्यांच्यासोबत काम करत असल्याची, माहिती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे वृद्ध दांमप्त आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अन्नपदार्थ विकून पैसे मिळवत होते. पण लॉकडाऊन झालं आणि त्यांची कमाई पूर्ण बंद झाली. अशातच एक यूट्यूबर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना या आजोबांना रडू कोसळले आणि बघता बघता व्हिडीओ व्हायरल झाला. कमी वेळात भरभरून मदत मिळल्यामुळे रडत असलेल्या आजोबांच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे. या 80 वर्षीय आजोबांनी लोकांचे आभार मानत, ज्यांना दोन वेळचं अन्न मिळत नाही, त्यांनी ढाब्यावर यावे त्यांची मी सोय करणार असल्याचे सांगितले होते. क्या बात! शाळेच्या आठवणींना उजाळा देत रतन टाटांनी शेअर केला 'जुना' फोटो, फॅन्स म्हणाले.....