आनंदाच्या प्रसंगी भरपूर फटाके फोडले जातात. पण, फटाके पेटवताना निष्काळजीपणा केला तर ते महागात पडू शकते. एका लग्नात फटाके फोडले जात असताना एका चुकीमुळे गाडीला आग लागल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सहारनपूरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नाच्या मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. बाजूलाच वरासाठी सजवलेली कारही उभी करण्यात आली होती. मात्र, फटाके इतके जोरात फुटत होते की, हे फटाके थेट वराच्या गाडीत जाऊन फुटल्याने कारने पेट घेतला. यात कार पूर्ण जळून खाक झाली.
सहारनपूरच्या गनदेवाडा गावात लग्नाच्या मिरवणुकीत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या तरुणांनी गाडीच्या वर ठेवलेल्या फटाक्यांना आग लागली. जळत्या कारमध्ये दोन तरुण अडकले होते. वराच्या भावाने दोन्ही तरुणांना तोंडाला जॅकेट गुंडाळून गाडीतून बाहेर काढले. जखमींना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. रात्री कारमध्ये बसलेल्या तरुणांनी सनरूफ उघडून, फटाक्यांचे बॉक्स गाडीच्या वर ठेवले आणि फटाके पेटवले. हळूहळू फटाक्यांच्या पेटीला आग लागली. जिथे सनरूप उघडे असल्याने फटाक्यांची पेटी कारच्या आत पडली आणि कारने पेट घेतला.
नवरा सतत ढेकर देणारा नको, अपेक्षांमुळे महिला झाली ट्रोल
सध्या लग्नासंबंधित एक जाहिरात व्हायरल होत असून, त्यात अनेक अपेक्षा करणाऱ्या तरुणीला ट्रोल करण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये एका तीसवर्षीय वधूने आपला होणारा नवरा कसा असावा, या बद्दलच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. स्वत: ३० वर्षीय असूनदेखील या तरुणीला २५ ते २८ वय असलेला वयाने तरुण असलेला वर हवा आहे. इतकेच नाही तर आपल्या जोडीदाराकडे गडगंज संपत्ती असावी. याशिवाय बंगला, मोठा बिझनेस, किमान २० एकरभर फार्महाऊस व स्वयंपाक करता यावा, अशा अपेक्षाही तिने लिहिल्या आहेत. जाहिरात देणारी महिला इतक्यावरच थांबली नाही, तर तिने आपला जोडीदार सतत ढेकर देणारा नसावा, अशी अटही तिने घातली आहे.