अनेकदा आपण असे अविश्वसनीय दृश्ये बघतो, जे वास्तवापासून फार वेगळे असतात. सोशल मीडियावर एक असाच चक्रावून सोडणारा (Optical Illusion Video) व्हिडीओ व्हायरल झाला (Social Viral Video) आहे. ज्यात एका बिल्डींगवर काही लोक उभे आहेत, तर काही लोक भींतीवर चालत आहेत. तसेच काही लोक बिल्डींगवर लेटलेले आहेत. आता हे पाहिल्यावर कुणीही कन्फ्यूज होईल.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, इतके सगळे लोक वेगवेगळ्या पोजिशनवर एका बिल्डींगवर उभे राहू शकत नाहीत. या व्हिडीओत एक अशी ट्रिक वापरली आहे जी फार बारबाईकने पाहिल्यावरच पकडली जाऊ शकते. समोर दिसणारी भींत मुळात एक मिरर इमेज आहे. सगळे लोक जमिनीवर तयार केलेल्या बिल्डींगच्या डिझाइनवर आपापली पोजिशन घेत आहेत आणि समोरून फोनवर फोटो क्लिक करत आहेत. (हे पण बघा : जबरदस्त! बिबट्या एक शेपट्या दोन; दुसरा बिबट्या शोधून शोधून दमलेत लोक, बघा तुम्हीही ट्राय करा!)
हा हैराण करणारा व्हिडीओ रायजिंग टेक नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून कुणीही कन्फ्यूज होऊ शकतं. अनेक लोक तर पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, अखेर हे शक्य कसं झालं. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण तर झालेच आहेत. सोबतच मजेदार कमेंटही करत आहेत.