आपल्याकडे शिक्षण म्हटलं की अगोदर लहान मुलांचा नकार असतो. शाळा, क्लासला जाण्यासाठी मुल कुटुंबियांना त्रास देत असतात. या संदर्भात अनेक प्रकरणे तुम्ही पाहिली असतील, तर काही विद्यार्थी दररोज शाळेत जाऊनही अभ्यास करण्यासाठी कंटाळा करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका चांगलीच व्हायरल झाली आहे, या उत्तर पत्रिकेत त्या विद्यार्थ्याने X ची व्हॅल्यू अशी काही लिहिली आहे, ती वाचून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
शालेय विद्यार्थ्याने सुट्टीच्या अर्जात शिक्षकांना लिहीले असे काही, वाचून तुम्हीही खूप हसाल...
ही गणित या विषयाची प्रश्नपत्रिका होती. यात X ची व्हॅल्यू काय होते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना या विद्यार्थ्याने 'जान थी वो मेरी' असं उत्तर लिहिले आहे. हे उत्तर पाहून प्रश्न पत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनी सरळ पालकांना बोलावण्याची सूचना दिली आहे. या उत्तर पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या विद्यार्थ्याने X ला Ex समजले की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. हा फोटो शेअर करुन अनेक वापरकर्त्यांनी कमेंट केल्या आहेत. एका युझरने लिहिले आहे.
हा प्रश्न एकूण 10 गुणांचा होता आणि शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला 0 गुण दिले आहेत. यासोबतच आईला बोलावून घेऊन येण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. तसे, आजच्या मुलांना उत्तरपत्रिकेत लिहिल्यानंतर काय आले पाहिजे, याचा आत्मविश्वासच नाही. अशी अनेक प्रकरणे बिहारमध्ये पाहण्यात आली आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी एका प्रश्नाच्या उत्तरात भोजपुरी गाणी लिहितात आणि जेव्हा तपासणी करणारा मास्टर त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करतो तेव्हा आश्चर्यचकित होते.