जयपूर - सोशल मीडियावर सध्या एका आयएएस अधिकाऱ्याचं ट्विट व्हायरल होत आहे. आपल्या या ट्विटमध्ये आयएश अधिकाऱ्यांनी मटरचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी सांगितलं की, एअरपोर्टमध्ये चेकिंगदरम्यान, त्यांच्या बॅगमध्ये मटार सापडली. त्यांच्या या ट्विटनंतर युझर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी तर गमतीगमतीत ही तर मटरची स्मगलिंग आहे, असं म्हटलं आहे.
हे ट्विट आयपीएस अधिकारी अरुण बोखरा यांनी केले आहे. आयपीएस अधिकारी बोथरा हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असतात. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये बॅगमध्ये भरलेल्या मटारचा फोटो शेअर करताना लिहिले की, जयपूर विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी माझी हँडबॅग उघडण्यास सांगितली.
अरुण बोथरा हे ओदिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडून बॅगमध्ये मटर असलेला फोटो शेअर करण्यात आल्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. त्यानंतर सर्वांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. आयएएस अधिकारी परवीन कासवान यांनी गमतीदार अंदाजात लिहिले की, ही तर मटारची तस्करी आहे.
आतापर्यंत आयपीएस बोथरा यांच्या या ट्विटला ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर दोन हजारांहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलंय. तर त्यावर शेकडो प्रतिक्रियाही आल्या आहेत. विमानातून प्रवास करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात मटार नेण्याची गरज काय होती, असा प्रश्न अनेक जणांनी विचारलाय. तर काही जणांनी गमतीदार भाषेत सांगितलं की, तपासणाऱ्यांना सांगायला पाहिजे होतं की, आतमध्ये ड्रग्स आहेत. म्हणजे तपासाच्या बहाण्याने मटार सोलून मिळाले असते.
आयपीएस अरुण बोथरा यांच्या या पोस्टवर युझर्सकडून अनेक गमतीदार कमेंट्स येत आहेत. एका युझरने लिहिलं की, वाटतं आज घरामध्ये मटार पनीर बनणार आहे. तर एका अन्य युझरने लिहिलं की, मटार सोलून मिळाले असते, तर खूप चांगले झाले असते.