आतापर्यंत एटीएम, पैसे किंवा पाकिट चोरी होण्याच्या अनेक घटना तुमच्यासमोर घडल्या असतील. सोशल मीडियावर एका बसस्टॉपच्या जागेचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. यानुसार पुणे शहरातील एक बसस्टॉप चोरीला गेलं आहे. ही घटना वाचून तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या माध्यमातून हे स्पष्ट होत आहे. हा फोटो reddit युजर u/ Sudhackar यांनी शेअर केला आहे.
त्यांनी या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, कोणीतरी माझ्या परिसरातील बस स्टॉप चोरून नेलं आहे. आता या ठिकाणी एक पोस्टर लावण्यात आलं आहे. या पोस्टरवर लिहिलंय की, बी.टी कवडे देवकी पॅलेस समोरिल पुणे परिवहनचा नागरिकांच्या सोयीचा बसस्टॉप चोरीला गेला आहे. कोणाला दिसल्यास संपर्क साधा रूपये ५ हजार बक्षिस देण्यात येईल.- मा. नगरसेवक प्रशांत (अण्णा) म्हस्के. Video: फॅशन डिजायनिंगच्या विद्यार्थ्यांचा PPE किट गरबा, गरबाप्रेमींनी लावली भन्नाट आयडिया
ट्विटर युजर @joleneann123 यांनीसुद्धा हा फोटो शेअर केला आहे. हसण्याची रिएक्शन देऊन पुण्याचा बसस्टॉप चोरीला गेला असं कॅप्शन दिलं आहे. आतापर्यंत या ट्विटला १२० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या घटनेकडे गमतीने पाहिले आहे. प्रत्यक्षात असं झालं नसेल असं म्हणत अनेक सोशल मीडिया युजर्सनी जुन्या घटनांचा उल्लेख केला आहे. दोन वर्षांपूर्वी मनसेने पोस्टर लावून एक पोलिस स्थानक चोरी झाल्याचे म्हटले होते. कारण त्यांच्यामते त्या पोलिस स्थानकात पोलिसांकडून समाधानकारक काम केलं जात नव्हते. तसाच काहीसा प्रकार घडला असावा असं अनेक युजर्सना वाटतं. देवमासा ठरला देवदूत! Whale ने केली उलटी अन् 'तो' करोडपती झाला ना राव....