लॉकडाऊनमुळे सध्या सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीयो व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शिकाराच्या शोधात असणारा एक सिंह गुजरातच्या एका प्राथमिक शाळेत शिरला. भारतीय वनविभागाचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी एक सिंह शिकाराच्या शोधात असताना एका गावातील शाळेच्या इमारतीत शिरला. आत शिरल्यानंतर सिंग गर्जना करताना दिसून आला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या सिंहाला पिंजऱ्यात बंद केलं आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीयो खूप व्हायरल होत आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह या शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील गाई- गुरांची शिकार करण्याच्या प्रयत्नात होता. पण सिंहाला शिकार न करताच परतावं लागलं. कारण या गाईंचा मालक असलेल्या व्यक्तीने या सिंहाला पाहिले आणि आरडाओरड करायला सुरूवात केली. त्यामुळे सिंह धावत येऊन या शाळेत शिरला. ही घटना गिर सोमनाथ जिल्ह्यात घडली. (हे पण वाचा-बापरे! माकडाच्या पिल्लानं चिमुकलीला फरफटत नेलं, पाहा Shocking Video)
जेव्हा ग्रामीण भागातील लोकांकडून सिंह शाळेत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंहाला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी अभियान तयार केलं. त्यांनंतर सिंहाला पकडण्यासाठी दरवाज्यासमोर एक पिंजरा ठेवला आणि सिंहाला पकडण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न यशस्वी ठरला नाही. नंतर या सिंहाला पिंजऱ्यात अडकवून पुन्हा जंगलात सोडण्यात आलं. ( हे पण वाचा-Video : मोराला उडताना पाहून कोरोनाचा सगळा ताण विसरून जाल, पाहा नयनरम्य दृश्य)