कोरोना व्हायरसता धोका टाळण्यासाठी 21 दिवसांसाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. कित्येक लोक घरात बंद आहेत. पोलिसांचे लोकांना फटके देतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तर कुठे लोकांच्या मदतीचे व्हिडीओ समोर येत आहेत. अशात दुसऱ्या शहरात राहणाऱ्या एका मुलाने लॉकडाउन दरम्यान कोबीचा पराठा तयार केला आणि त्याचा फोटो आईला व्हॉट्सअॅप केला. आता शेवटी ती आईच ना...सर्व आयांसारखंच ती बोलली.
अक्षर पाठक नावाच्या व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केल आहे. हा फोटो पराठ्याचा आहे जो त्याने त्याच्या आईला व्हॉट्सअॅप केला होता. त्याने आईला सांगितले की पराठ्याला रेटींग दे. आईने 11/10 रेटींग दिलं. नंतर लिहिलं की, 'केळ पडून पडून खराब होत आहे'. या फोटोत एक केळंही दिसत आहे. जे खराब होत असल्याचं दिसतं. आईची नजर त्यावरही गेली.
आता या फोटोवर अनेकांनी मजेदार रिप्लाय केले आहेत. अशाप्रकारच्या कमेंट भारतीय आईच करू शकते असेही काही लोक बोलत आहेत.