काही दिवसांपूर्वी एका बातमीने सर्वांचच मन दुखावलं होतं. डॉ.दीपशिखा घोष यांनी एक ट्विट केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, कशाप्रकारे कोरोनाने संक्रमित एक आई अखेरचा श्वास घेत होती आणि व्हिडीओ कॉलवर तिचा मुलगा आईसाठी अखेरचं गाणं गात होता. या बातमीने लोकांना विचार करायला भाग पाडलं होतं की, आपण किती लाचार झाले आहोत. त्याच मुलाने आईसाठी गायलेलं गाणं पुन्हा एकदा गायलं आहे.
सोहम असं या तरूणाचं नाव असून त्याने इन्स्टावर आपल्या आईसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या आईचं निधन कोविडमुळे झालं होतं. तोच शेवटच्या घटका मोजणाऱ्या आईला व्हिडीओ कॉलवरून गाणं ऐकवत होता. आता पुन्हा एकदा त्याने तेच गाणं आईसाठी गायलं आहे. (हे पण वाचा : हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजणाऱ्या आईसाठी मुलानं केलं असं काही, डॉक्टर-नर्सेसनाही कोसळलं रडू)
त्याने या व्हिडीओत सांगितलं की, हे गाणं माझं आणि माझ्या आईमधील प्रेम दर्शवतो. 'मी आजही तिला परत बोलवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अनेकदा ते शक्य नसतं. जे व्हायचं ते होऊनच राहतं. आम्ही तिला वाचवू शकलो नाही. पण आशा आहे की तिला माहीत आहे की, आम्ही तिच्यावर किती प्रेम करतो. आई तुझ्यासाठी'.
'माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही की, ती मला बघत असेल. मला या गोष्टीवर विश्वास नाही. पण जेव्हा मी रडत असतो तेव्हा मला नेहमी वाटतं की, आई रडत असेल. मी नाही रडत. जशी ती रडत होती, तसाच मी रडतो. ती माझ्यात आहे. सर्वांच्या प्रेमासाठी खूप आभार'.