कोरोना संकटात मजदूरांसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा देवासारखा धावून आला आहे. आतापर्यंत सोनू सूदनं अनेक मजूरांना त्यांच्या गावी पाठवले आहे. त्यासाठी सर्वत्र त्याचं कौतूक होत आहे. प्रवासी मजूरांच्या मदतीनंतर आता केरळमधील एर्नाकुलम येथे अडकलेल्या 177 मुलींना स्पेशल विमानाने त्यांच्या घरी सोनू सूद पोहचवणार आहे. त्या मुली केरळमधील एका फॅक्टरीमध्ये शिवणकाम व एम्ब्रॉडरीचे काम करतात. कोरोनामुळे ही फॅक्टरी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र त्या मुली तिथेच अडकल्या होत्या. पडद्यावरील खलनायक खऱ्या आयुष्यात मात्र सर्वांसाठी नायक ठरताना दिसत आहे.
सोनूच्या या समाजकार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. सामन्य माणसांपासून ते मोठ मोठ्या सेलिब्रेटींनी सोनू सूदचे कौतुक केले आहे. पण, सोशल मीडियावर आता त्याचा एक जूना फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. सोनू सूदनंही तो फोटो रिट्विट करत, आयुष्य हे वर्तुळाप्रमाणे आहे. असं लिहिले आहे.
काय आहे या जुन्या फोटोमागची कहाणी?सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो सोनू सूदच्या रेल्वे पासचा आहे. मार्च 1998 मधला हा पास आहे. जेव्हा सोनू सूद मुंबईच्या रेल्वेतून प्रवास करायचा. जुलै 1997 मध्ये पश्चिम रेल्वेवरून हा पास काढण्यात आला होता. तेव्हा सोनू 24 वर्षांचा होता. बोरिवली ते चर्चगेट पर्यंतचा हा पास 420 रुपयांत काढला गेला होता. एका चाहत्यानं हा पास शेअर करत रिअल स्ट्रगल असे ट्विट केले. त्यानं लिहिलं की,''मेहनत करून यशस्वी झालेला माणूसह दुसऱ्यांचे दुःख समजू शकतो. एकेकाळी सोनू सूदही 420 रुपयांचा पास काढून रेल्वेनं प्रवास करायचा.'' हा फोटो पाहून सोनू सूदही भावूक झाला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा अपघात; गाडीची अवस्था पाहून उडेल थरकाप!
भाजपा खासदार गौतम गंभीरच्या वडिलांच्या गाडीची चोरी
सोशल अकाऊंटवरून पॉर्न क्लिप व्हायरल; पाकिस्तानी गोलंदाज ट्विटवर होतोय ट्रेंड!
हरभजन सिंगची मस्करी करणं विराट कोहलीला पडलं महाग; फिरकीपटूनं दिलं चॅलेंज
भारत मुद्दाम वर्ल्ड कपचा तो सामना हरला!; पाक क्रिकेटपटूच्या राजकारणाला बेन स्टोक्सचे सडेतोड उत्तर
हजार फुटांवरून त्यानं सहकाऱ्याला फेकलं; शोएब अख्तरनं शेअर केला थरकाप उडवणारा Video