शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

हिंमतीला कडक सॅल्यूट! डिलिव्हरी बॉयच्या धाडसाचं तुम्हीही कराल कौतुक; Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:57 PM

मोटराइज्ड व्हीलचेअरवर बसलेली एक व्यक्ती पुढे जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने झोमॅटोचा टी-शर्ट घातला असून हेल्मेटही घातले आहे.

हिंमत असेल तर कोणतेही काम अवघड नसते असे म्हणतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यात डिलिव्हरी एजंट्सच्या संघर्षाच्या गोष्टी आहेत. त्यांच्यापासून अनेक जण प्रेरणा घेतात. पण सध्या ट्विटरवर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक दिव्यांग डिलिव्हरी बॉय दाखवण्यात आला आहे. त्यांचा हा प्रवास कोणत्याही सामान्य माणसाला प्रेरणा देणारा आहे. झोमॅटोने देखील ट्विट करून डिलिव्हरी बॉयला त्यांचा हिरो म्हटलं आहे.

छोटीशी दुखापत झाली तर आपण आपलं काम अनेक वेळा पुढे ढकलतो. काही वेळा हे निमित्त काढून चांगल्या संधी मिस केल्या जातात. पण व्हिडिओमध्ये दिसणारी ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच हिंमत देईल. हिमांशू नावाच्या ट्विटर युजरने @himanshuk783 अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. अडचणींना मागे टाकून स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या एका डिलिव्हरी बॉयची ही कथा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य अनेकांना हिंमत देत आहे.

मोटराइज्ड व्हीलचेअरवर बसलेली एक व्यक्ती पुढे जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने झोमॅटोचा टी-शर्ट घातला असून हेल्मेटही घातले आहे. हिमांशू यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. पण जेव्हा डिलिव्हरी बॉयला कळतं की कोणीतरी त्याचा व्हिडीओ काढत आहे तेव्हा तो एक सुंदर स्मितहास्य करतो. यासोबतच असेही सांगितले जाते की, आयुष्यात कधीही आशा सोडू नये. तो हिमांशूला विक्ट्री साइनही दाखवतो. जेव्हा त्याला सांगण्यात आलं की, तुम्ही हे चांगले काम करता. तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयने हसून उत्तर दिलं की हो मी करतो आणि ते करायला हिंमत लागते.

आत्तापर्यंत 14 हजार वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. यावर अनेकजण प्रतिक्रियाही देत ​​आहेत. काही लोक तो खरा हिरो असल्याचं सांगत आहेत, तर अनेकांनी यातून प्रेरणा घेतल्याचं देखील म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी लखनौच्या एका डिलिव्हरी बॉयची गोष्टही व्हायरल झाली होती, जो गाझीपूरहून लखनऊला आला होता आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ZomatoझोमॅटोSocial Viralसोशल व्हायरल