नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा हल्ली मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन ट्रेंड येत असतात. विविध गोष्टी या जोरदार व्हायरल होत असतात. अशीच एक गोष्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. एका पॅकेटवरील पत्त्याचा भन्नाट फोटो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग करण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र डिलिव्हरीसाठी घराचा पत्ता अचूक देणं अत्यंत आवश्यक असतं. अशाच एका डिलिव्हरी पॅकेटवरील पत्त्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
एखादी वस्तू ऑनलाईन मागवल्यानंतर राहण्याचं ठिकाण, इमारतीचं नाव अशा सर्व गोष्टी सामान्यत: दिल्या जातात. जेणेकरून मागवण्यात आलेली वस्तू घरपोच येण्यास मदत होते. राजस्थानमधील एका व्यक्तीने शॉपिंग साईटवरून काही सामान ऑर्डर केलं. मात्र यावरील मजेशीर पत्ता पाहून चक्रावून जाल. 448 छठ माता मंदिर, मंदिराच्या समोर आल्यावर लगेचच फोन करा, मी येईन, शिवपूरा असा पत्ता देण्यात आला आहे. सध्या या पत्त्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नेटिझन्सनी या व्हायरल फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे. ट्विटरवर काही जणांनी हा फोटो ट्विट केला असून अनेकांनी ते रिट्विट केलं आहे. तसेच मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी सातत्याने व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये लग्नात चक्क नवरी लॅपटॉप घेऊन काम करताना दिसली. 'तुम्हाला जर तुमचं काम खूप वाटत असेल तर हा व्हिडीओ पाहा' असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
Vikas Dubey Encounter : "मी समाधानी आहे पण... ", शहीद पोलिसाच्या पत्नीने म्हटलं...
लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल
Vikas Dubey Encounter : "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?"
Vikas Dubey Encounter : "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यांचा हल्लाबोल
Vikas Dubey Encounter : लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं