कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे शिक्षणपद्धती ऑनलाईन करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. ऑनलाईन अभ्यास केल्यानंतर ऑफलाईन परिक्षा द्यायचं म्हणताच मुलांना धडकी भरली. कारण कोरोनाकाळात अभ्यासाचं स्वरूप फार बदलले. परीक्षेला पोहोचलेल्या विद्यार्थ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये ते सांगत आहेत की, ऑनलाईन वर्ग घेतल्यानंतर ऑफलाइन परीक्षा घेणे किती कठीण आहे. आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कोरोना व्हायरसमुळे शाळा-महाविद्यालय बंद होते. त्यामुळे मुलं वर्षभर ऑनलाइन अभ्यास करत होते. परंतु त्यांना परीक्षेसाठी परीक्षा हॉलमध्ये यावे लागले.
व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी म्हणतो, 'ऑनलाइन शिक्षण घेतल्यानंतर ऑफलाइन परीक्षा घेणे म्हणजे पबजी खेळल्यानंतर सैन्यात भरती होण्यासारखे आहे.' व्हिडिओ शेअर करताना आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी 'परीक्षा, सेना आणि पबजी' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. Corona Precautions : कोरोनाशी लढण्यासाठी आयुष मंत्रालयानं दिले घरगुती उपाय; इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा फंडा
हा व्हिडिओ त्यांनी 5 मे रोजी शेअर केला आहे, ज्यावर आतापर्यंत 2 हजाराहून अधिक व्हिव्हज आहेत. तसेच बरेच लाईक्स व री-ट्वीटदेखील केले आहेत. लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. लोकांनी कमेंट्स विभागात अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मास्क लावल्याने गुदमरल्यासारखं होतं का?... मग या साध्या-सोप्या टिप्स वाचाच!