शालेय दिवसात मुलं पास होण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या अवलंबतात, काही पोट्टे असे असतात की ते परीक्षेत उत्तराऐवजी गाणीही लिहून मोकळे होतात. काहींची उत्तर वाचून अगदी शिक्षकांनाही डोळ्यासमोर दिवसा तारे दिसू लागतात. सध्या अशीच एक उत्तरपत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एका विद्यार्थ्यानं लग्न संस्थेची व्याख्याच बदलून टाकली आहे. लग्नाचं डेफिनेशन म्हणजे काय? याचं उत्तर एका विद्यार्थ्यानं असं काही दिलं की ते वाचून शिक्षकांनी डोक्यावरच हात मारला. भले विद्यार्थ्याला १० पैकी शून्य मार्क मिळाले असले तरी नेटिझन्सना पठ्ठ्याचं उत्तर जाम भावलं आहे.
व्हायरल होत असलेला फोटो टेस्ट एका उत्तर पत्रिकेचा आहे. ज्यामध्ये एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यात आला आहे. लग्न म्हणजे काय? जरी हा एक साधा निबंधाच्या स्वरूपातील प्रश्न असला तरी मुलं किती कल्पकतेनं उत्तर देतात हे शिक्षकांना पहायचं होतं. एका विद्यार्थ्यानं लग्नाचं डेफिनेशन सांगताना भन्नाट तर्क मांडला आहे. हे ट्विट srpdaa नावाच्या ट्विटर युजरने ट्विटरवर शेअर केले आहे. ज्यावर शिक्षकानं शून्य गुण दिले आहेत आणि विद्यार्थ्याला भेटायलाही बोलावलं आहे.