अलिकडे जास्तीत जास्त लोक हे ऑनलाइन शॉपिंगचा वापर करतात. याने लोकांचा वेळही वाचतो आणि आवश्यक आरामही होतो. म्हणजे आज ग्राहकांना कोणत्याही वस्तूची गरज असेल तर ती त्यांच्या बोटांच्या इशाऱ्यावर उपलब्ध होते. पण अनेकदा यात या ग्राहकांची मोठी फसवणूकही होते.
तुम्हीही अनेकदा ऑनलाइन काही ऑर्डर केल्यावर फसवणूक झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. कधी मोबाइलच्या जागी साबण, तर कधी वेगळंच काहीतरी पार्सल अनेकांना मिळालंय. पण आज एका तरूणीसोबत काय झालं हे सांगणार आहोत, जे वाचून तुम्ही चक्रावून जाल.
इंग्लंडच्या स्टेफोर्डशायरमध्ये कीले यूनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी २१ वर्षीय तरूणी लियोनी पॅटिसनसोबत एक अजब घटना घडली. लियोनीने प्रॅटीलिटलशिंग नावाच्या वेबसाइटवरून २ हजार २८३ रूपयांचा स्कर्ट ऑर्डर केला होता. पार्सलही आलं. पण पार्सल उघडून पाहिल्यावर तिला धक्काच बसला.
जेव्हा लियोनीने ऑनलाइन ऑर्डर केलेल्या पार्सलचं पॅकेट उघडलं तर ते पाहून ती थक्क झाली. कारण लियोनी पॅटिसनला स्कर्टच्या पॅकेटसह कंडोमची पॅकेच त्यात आढळलं.
हे पाहून लियोनीला राग अनावर झाला. त्यानंतर तिने कंपनीने केलेल्या या कृत्याची संपूर्ण कहाणी सोशल मीडियात शेअर केली. लियोनीने ट्विटरवर पोस्ट शेअर करून कंपनीला चांगलीच खरीखोटी सुणावली. लोकांनीही यावर कमेंट केल्या आहेत.
दरम्यान कंपनीने लियोनीची माफी मागितली. सोबत म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच कंपनीने या ग्राहकाचे डिटेल्सही मागवले आहेत.