सोशल मीडियावर नेहमीच विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका व्हायरल होत असतात. ज्या वाचून लोकांचं डोकं चक्रावून जातं तर कधी पोटधरून हसायला येतं. सध्या अशीच एक उत्तर पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून जी बघून लोक काय तर शिक्षकानेही कपाळावर हात मारून घेतला आहे.
शिक्षक आणि इन्स्टाग्राम यूजर राकेश शर्मा यांनी हर्ष बेनीवाल नावाच्या विद्यार्थ्याचा गणिताचा पेपर दाखवत एक व्हिडीओ शेअर केला आहे. विद्यार्थाने यात जे काही लिहिलं ते वाचून सोशल मीडिया यूजर अवाक् झाले आहेत. सोबतच त्यांना हसूही आवरता येत नाहीये.
व्हिडीओच्या सुरूवातीला तुम्ही बघू शकता की, त्यांनी हर्षचा पेपर चेक केला आणि प्रत्येक उत्तरावर त्याला गुण दिलेत. पेपरच्या शेवटी हर्षने लिहिलं की, "शिकून काय करायचं आहे. एक दिवस तर मरायचं आहेच, तरीही पास होण्याची ईच्छा आहे". हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर याला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि खूपसारे लाईक्स मिळाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांआधीच एका दुसऱ्या विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका व्हायरल झाली होती. ज्यात त्याने हृदयाची एक आकृती काढली होती. आकृती तर बरोबर होती. पण हृदयातील वेगवेगळ्या भागांना त्याने मुलींची नावे दिली होती. त्याने हरिता, प्रिया, पूजा, नमिता आणि रूपा अशी पाच मुलींची नावे लिहिली होती. इतकंच नाही तर त्याने त्यांच्याबाबत लिहिलंही होतं.
प्रियाच्या नावासमोर मुलाने लिहिलं की, ती नेहमीच त्याच्यासोबत इन्स्टावर चॅटींग करते. ती त्याला आवडते. रूपासमोर लिहिलं की, तो रूपासोबत स्नॅपचॅटवर चॅटींग करतो. ती फार सुंदर आणि क्यूट आहे. नमिताच्या नावासमोर लिहिलं की, ही शेजाऱ्याची मुलगी आहे. तिचे केस लांब आहेत आणि डोळे मोठे आहेत. पूजा या मुलाची एक्स गर्लफ्रेंड आहे. तो तिला विसरू शकत नाही. हरिता त्याची क्लासमेट आहे.