शाळेच्या दिवसात विद्यार्थ्यांना अर्ज लिहिण्याचा टास्क दिला जातो. मराठी, हिंदी वा इंग्रजी विषय असो अर्ज लिहावाच लागतो. अनेकदा मुलं या अर्जात अनेक अजब गोष्टी लिहून टाकतात. पण एका विद्यार्थ्याने अजब लिहिण्याची सीमाच पार केली आहे. फी जमा न करण्याचं त्याने एक फारच मजेदार असं कारण दिलं आहे. तुम्ही हा अर्ज वाचा आणि त्याने धमकी दिला आहे की ब्लॅकमेलींग केलं आहे तेही ठरवा. कदाचित घाबरून टीचरने त्याला पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. इतकंच नाही तर त्याची फी सुद्धा माफ केली आहे.
इन्स्टाग्राम हॅंडल आय एम कॉमेडिअन कविताने हा अर्ज शेअर केला आहे. ज्याचा विषय आहे फी माफीसाठी अर्ज. हा अर्ज शाळेच्या मुख्याध्यपकांच्या नावे लिहायचा होता. मुलाने अर्जात लिहिलं आहे की, 'घरातून फी चे 1500 रूपये घेऊन निघालो होतो. पण रस्त्यात गर्लफ्रेंड भेटली. तिला पिझ्झा खाऊ घालण्यासाठी घेऊन जावं लागलं. पिझ्झा शॉपवर मी तुम्हाला पूजा मॅडमसोबत बिघतलं आणि तुमचा व्हिडीओही काढला'. यानंतर त्याने लिहिलं की, 'माझी फी माफ किंवा तुमचा पर्दाफाश'. यापुढेही त्याने एक मजेदार लाईन लिहिली की, 'धमकीसहीत तुमचा आज्ञाधारी विद्यार्थी नाव पप्पू चोर, कक्षा फोर....'.
आता तुम्हीच विचार करा की, असा अर्ज असेल तर मुख्याध्यापकांना तर पैकीच्या पैकी गुण द्यावेच लागतील ना! या अर्जाला मुख्याध्यापकांनी पैकीच्या पैकी म्हणजे 10 पैकी 10 गुण दिले आहेत आणि सोबतच लिहिलं आहे की, बेटा सगळं काही माफ. आता हा अर्ज खरंच कोणत्या शाळेचा आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलं नाही. हा खरा असल्याचा दावाही आम्ही करत नाही. पण इतकं नक्की की, याने सोशल मीडिया यूजरना चांगली मजा आली असेल. या पोस्टला पाच लाख 24 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर लोकांनी यावर अनेक मजेदार कमेंट्सही केल्या आहेत.