VIDEO:शाळेची दुरावस्था! मुलांना वर्गात चक्क छत्री घेऊन बसण्याची आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 06:07 PM2022-07-27T18:07:28+5:302022-07-27T18:09:53+5:30
मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील एका शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सिवनी : मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील एका शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळेची दुरावस्था पाहायला मिळत आहे. कारण शाळेतील मुले वर्गात चक्क छत्री घेऊन बसली आहेत. शाळेची स्थिती एवढी वाईट झाली आहे की ठिकठिकाणी पाणी गळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना पाण्यापासून वाचवण्यासाठी छत्रीचा सहारा घ्यावा लागत आहे. अशा दुरावस्थेत विद्यार्थी कसे अभ्यास करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावरून प्रशासनाचा कारभार उघड करणारी ही व्हिडीओ सिवनी जिल्ह्यातील घनसौर येथील आहे. तिथे कार्यरत असलेल्या शिक्षकांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात शाळेत पाणी गळते म्हणून मोठ्या प्रमाणात मुलं शाळेकडे पाठ दाखवतात. तसेच जी मुलं शाळेत येतात त्यांना सोबत छत्री घेऊन बसावे लागत आहे. शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी मे महिन्यात संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती मात्र अद्याप कोणताच बदल झालेला नाही.
मध्यप्रदेश में शिवराज सरकार में एक तरफ़ अत्याधुनिक सीएम राइज़ स्कूल के बड़े-बड़े दावे और दूसरी तरफ़ प्रदेश के सिवनी जिले के खैरीकला गाँव के प्राथमिक स्कूल में छत से टपक रहे पानी से बचने के लिए स्कूल के अंदर छाता लगा कर पड़ाई करने पर मजबूर छात्र…
— Narendra Saluja (@NarendraSaluja) July 26, 2022
यह है शिवराज सरकार की वास्तविकता pic.twitter.com/QApypA4QOm
कॉंग्रेसने सरकारवर साधला निशाणा
कॉंग्रेसने हा व्हिडीओ शेअर करून शिवराज सिंग चौहान सरकारवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे मीडिया समन्वयक नरेंद्र सलूजा यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. "मध्य प्रदेशमधील शिवराज सरकारमध्ये एकीकडे अत्याधुनिक सीएम रायझ स्कूलने मोठे दावे केले आहेत तर दुसरीकडे छतावरून पाणी गळत आहे म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत छत्री घेऊन अभ्यास करावा लागत आहे. राज्यातील सिवनी जिल्ह्यातील खैरिकाला गावातील प्राथमिक शाळेची दुरावस्था. हे शिवराज सरकारचे वास्तव आहे," अशा शब्दांत त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.