Video Of Stunning Cloudburst: भारतातील काही भागांमध्ये सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी आहेत. पावसाने अनेक समस्याही समोर येतात. जसे की, मुसळधार पावसाने रस्त्यांवर खड्डे पडतात. अनेकदा तर ढगफुटीमुळेही मोठं नुकसान होतं. कधी कधी ढगफुटी इतकी भयावह असते की, कल्पने पलिकडे नुकसान होतं.
सोशल मीडियावर निसर्गाचं सौंदर्य दाखवणारे अनेक व्हिडीओ बघायला मिळतात. तुम्ही कधी विचारही केला नसेल की, ज्या ढगफुटीमुळे इतकं मोठं नुकसान होतं ते दृश्य इतकं सुंदर असेल. एका फोटोग्राफरने कॅमेरात असाच सुंदर नजारा कैद केला आहे.
या व्हिडीओबाबत दावा करण्यात आला आहे की, ऑस्ट्रियाच्या लेक मिलस्टॅटचा हा नजारा आहे. असं सांगितलं जात आहे की, ढगफुटीचा हा व्हिडीओ फोटोग्राफर पीटर मायरने कॅमेरात कैद केला. हा सुंदर आणि अद्भूत व्हिडीओ पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. कुणाला विश्वास बसत नाहीये की, ढगफुटी अशाप्रकारे होते. बघू शकता की, कशाप्रकारे ढगातून पाणी पडत आहे आणि अचानक ढगफुटी होऊ किती मोठ्या प्रमाणात पाणी खाली पडतं.
बालपणी किंवा आताही आपण वाचत असतो की, ढगफुटी कशी होते. पण जास्तकरून अशा घटना डोंगरांमध्ये जास्त होतात. असं सांगितलं जातं की, पाण्याने भरलेल्या ढगांना उंच डोंगर पुढे जाण्यास रोखतात आणि पाणी भरलेले ढग जास्त वेळ एका ठिकाणी थांबू शकत नाही, अशात ढगफुटी होते.