धावत्या गाड्यांमधून किंवा ट्रेनमधून इकडून तिकडे उड्या मारणारे अनेक स्ंटंट तुम्ही फायटिंगच्या सिनेमांमध्ये पाहिले असतील. हॉलिवूड नाही तर अगदी बॉलिवूडमध्येही हे केले जाते. काही सिनेमांमध्ये तर विमानांवरही स्टंट केले जातात. परंतू ते खोटे असतात. आज दोन चुलत भावांनी जो स्टंट करण्याचा प्रयत्न केलाय तो मात्र, अस्सल-खराखुरा आहे.
दोन चुलत भावांनी एक अनोखा स्टंट केला. दोघेही दोन वेगवेगळ्या विमानांनी हवेत झेपावले, त्यांना विमानांची अदलाबदल करायची होती. यासाठी दोघांनीही विमानातून बाहेर उडी मारली परंतू स्टंट फेल झाला आणि एक विमान धू धू करत खाली कोसळले.
ल्यूक एकिन्स आणि अँडी फारिंग्टन या दोघांनी या खतरनाक स्टंटचा प्रयत्न केला. एका ठराविक उंचीवर जात त्यांनी विमानांमधून एकमेकांच्या दिशेने उडी घेतली. सारे गणित घातले होते, सारे फॉर्म्युले वापरले होते, परंतू एका विमानामध्ये टेलस्पिन झाले आणि ते हवेत हेलकावे घेऊ लागले. यामुळे दोघांनीही आपला प्रयत्न सोडला. पहिले विमान खाली कोसळू लागले. दोघेही जमिनीवर सुखरुप परतले.
विमान किती उंचीवर असावे, दोन विमानांतील अंतर किती असावे आदी सारे कॅल्क्युलेशन या दोघांनी घातले होते. ज्या प्लेनमधून फारिंग्टनला जायचे होते, ते आऊट ऑफ कंट्रोल झाले यामुळे तो त्या विमानात जाऊ शकला नाही. मात्र, ऐकिन्स या विमानातून दुसऱ्या विमानात सुखरूप गेला. त्याचा स्टंट यशस्वी झाला. फारिंग्टनला मात्र पॅरॅशूटचा वापर करावा लागला. सेसना १८२ विमानातून हा स्टंट करण्याचा प्रयत्न केला गेला. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.