आपल्या देशात सोनं-चांदीला मोठी मागणी आहे, देशात १० ग्रॅम सोन्याचे दर ६० हजार रुपयांवर गेले आहेत. तर चांदीचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. भारतात अशी एक नदी आहे या नदीतसोनं वाहून येतं. भारतात ४०० हून अधिक लहान-मोठ्या नद्या वाहतात. देशभरातून वाहणाऱ्या या नद्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. यात एका नदीत सोनं वाहून येतं.
सोन्याची ही नदी झारखंडमध्ये वाहते. या नदीचे नाव स्वर्णरेखा नदी आहे, फक्त पाणीच नाही तर सोनेही वाहते. यामुळे ही नदी जगभरात प्रसिद्ध आहे. स्थानिक या नदीला सोन्याची नदी देखील म्हणतात. झारखंडमधून वाहणारी ही नदी ओडिशा आणि पश्चिम बंगालमधून वाहते आणि बालेश्वर नावाच्या ठिकाणी बंगालच्या उपसागरात मिळते.
Google : मस्तच! भूकंप येण्याअगोदर मोबाईलर मिळणार अलर्ट!Google'ची 'ही' सेवा वाचवणार तुमचा जीव
या ४७४ किलोमीटर लांबीच्या नदीतून आदिवासी लोक पहाटेपासून सोने गोळा करतात. हे लोक दिवसभर काबाडकष्ट करून नदीतून सोन्याचे कण शोधून गोळा करतात. अनेक वर्षांपासून या गावकऱ्यांच्या पिढ्या हेच काम करत आहेत. तामार, सारंडा यांसारखे अनेक भाग आहेत, जिथे पुरुष, महिला आणि मुले पहाटे उठून नदीतून सोन्याचे आणि कण गोळा करतात.
कधी कधी दिवसभर शोधून काही सापडत नाही, पण महिन्याभरात ७० ते ९० कण सापडतात. नदी खडकांमधून जाते, त्यामुळे खडकांमध्ये सापडलेले सोन्याचे तुकडे तुटून नदीत मिसळतात. नदीत वाहून ते दूर जातात. गावकरी आणि त्यांचे पूर्वज वर्षानुवर्षे हे कण गोळा करण्याचे काम करतात.