मुंबई - जर तुम्ही रस्त्यावरून पायी जात असला तक अशा वेळी फोनचा वापर खूप कमी केला पाहिजे. कारण रस्त्यातून चालताना आपलं लक्ष फोनवर असतं, त्यामुळे अनेकदा वाटेतील खड्डे, ये जा करणाऱ्या गाड्या यांकडे आपलं लक्ष जात नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. दरम्यान, फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीसोबत घडलेली अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती फोनवर बोलत आहे. मात्र काही सेकंदातच त्याच्यासोबत एक दुर्घटना घडते. ही व्यक्ती फोनवर बोलत एका बाजूला वळते तेव्हा तिथे जमिनीमध्ये एक मोठा खड्डा पडतो. तसेच हा फोनवर बोलत असलेला माणूस त्यात पडतो. हा प्रकार पाहिल्यावर आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीला धावतात. मात्र जेव्हा हे लोक त्याला मदतीचा हात देतात तेव्हा त्यांच्या पायाखालील जमिनही दुभंगते आणि तेही खाली बनलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडतात. त्यानंतर अजून एका व्यक्तीने प्रसंगावधान राखत या सर्वांना बाहेर काढले.
सोशल मीडियावर या प्रकाराच व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पाहणारेही आश्चर्यचकीत होत आहेत. एकदम सपाट असलेली जमीन अचानक दुभंगेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. अगदी काही सेकंदांपूर्वी हे लोक जिथे उभे राहून गप्पा मारत होते, तीच जमीन काही सेकंदांनंतर दुभंगून हे सर्वजण त्यात सामावले गेले. त्यानंतर त्या खड्ड्यातील पाण्यात हातपाय मारून ते स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. आतापर्यंत हा व्हिडीओ १५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.