गणितज्ञ आणि सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार (Anand Kumar) न्यू जर्सीच्या एका मॉलमध्ये खरेदी करत असताना अचानक त्यांना त्यांचा एक जुना विद्यार्थी भेटला. आनंद कुमार यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं की, संदीप चौधरीसोबत त्यांची भावनिक भेट एखाद्या सिनेमाच्या कथेसारखीच होती.
आनंद कुमार हे अमेरिकेतील एका मॉलमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही वस्तूंची खरेदी करत होते. जेव्हा अचानक संदीप चौधरी त्यांच्याजवळ आला आणि संदीप लगेच त्यांच्या पाया पडला. त्याने आनंद कुमार यांचं खरेदी केलेल्या वस्तुंच बील भरलं.
चौधरीसोबतचा फोटो शेअर करत आनंक कुमार यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'माझ्या जीवनात नेहमीच अशा काही घटना घडत असतात ज्या एखाद्या सिनेमाच्या कथेसारख्या वाटतात. आज मी न्यू जर्सीच्या एका मॉलमध्ये मुलांसाठी काही वस्तू खरेदी करत होते. अचानक मागून आवाज आला आनंद सर...तुम्ही इथे अमेरिकेत आहात? तो माझ्या पाया पडला आणि म्हणाला, सर मी संदीप चौधरी तुमच्या विद्यार्थी आहे. नंतर त्यानेच वस्तूंची बील पे केलं'.
त्यांनी लिहिलं की, 'पेमेंट करतेवेळी तो म्हणाला की, सर मी तुमच्या आशीर्वादाने आज इथपर्यंत पोहोचलो'. इतकंच नाही नंतर त्याने त्याच्या कारमधून मला मी राहत असलेल्या ठिकाणी सोडलं. असो, माझ्यासारख्या शिक्षकासाठी यापेक्षा गर्वाची बाब काय असू शकते.