ऐन दिवाळीआधी गुजरातमधून डोकं चक्रावणारं प्रकरण समोर आलं आहे. इथं काही मुलं गटारीच्या झाकणावर म्हणजेच मॅनहोलवर फटाके फोडत होते. तेवढ्यात या गटारीलाच आग लागली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ही सगळी घटना सूरत शहरातील असल्याचं सांगितलं जात आहे. इथल्या तुलसी चरण सोसायटीबाहेर काही मुलं फटाके पेटवत होते. तितक्यात गटारीला आग लागली. क्षणार्धात त्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. ही मुलं वेळीच बाजूला झाली, त्यामुळे कुणीही गंभीररित्या यात भाजलं नाही.
गटारीत सडणाऱ्या गोष्टींमधून मिथेन गॅस बाहेर पडत असतो. जो अतिज्वलनशील मानला जातो. अगदी हीच प्रक्रिया बायोगॅस प्लांटमध्येही होत असते. नशिबाने या गटारी जास्त प्रमाणात हा गॅस नव्हता, त्यामुळे काहीच वेळात ही आग विझली.
अजून एका मीडिया रिपोर्टनुसार, या सोसायटीच्या बाजूलाच एका गॅस पाईपलाईनचं का सुरु आहे. त्यामुळे त्यातून लिक होणारा गॅस गटारीत भरला गेल्याचाही अंदाज आहे. त्यामुळेच जेव्हा या मुलांनी गटारीच्या झाकणावर फटाके पेटवले, तेव्हा आगीचा भडका उडाला.