आजकाल स्विगी आणि झोमॅटो सारखे ॲप्स आपल्याला अनेकांच्या मोबाईलमध्ये दिसतात. कारण या अॅपच्या मदतीने आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमधील जेवण एका क्लिकवर थेट घरपोच मागवू शकतो. खरे तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात सर्वात महत्वाची भूमिका कुणाची असेल, तर ती डिलिव्हरी बॉईजची. जे जेवण तुमच्या घरी घेऊन येतात. तर, दिवसभर शहरात फिरणाऱ्या या डिलिव्हरी बॉईजची कमाई किती असेल? जाणून घेऊयात...
काही दिवसांपूर्वी Full Disclosure नावाच्या एक YouTube चॅनलने काही डिलिव्हरी बॉईजसोबत चर्चा केली होती. बालता बोलता ही चर्चा सॅलरी अथवा कमाईवर गेली, तेव्हा अनेकांना धक्का बसला. यावेळी, किती कमावता? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर आले, 'एका दिवसात 1500 ते 2000 आरामात होतात. माग आठवडा भरात 10 ते 12 हजार नक्की होतील आणि महिन्याचे 40 ते 50 हजार पक्के आहेत.'
एवढेच नाही तर त्याने फोनवरून कमाईचा पुरावाही दाखवला. आणखी एका डिलिव्हरी बॉयने सांगितले की, याशिवाय, टिप्समधून सुमारे 5 हजार रुपये आणि पावसाळ्यात डिलिव्हरी केल्यास थोडे अधिकही येतात. विशेष म्हणजे, अनेक प्लॅटफॉर्मवर रक्कम आधीच ठरलेली असते. तसेच, डिलिव्हरीचे ठिकाण दूर असेल तर, प्लॅटफॉर्म काहीवेळा अधिक शुल्कही आकारते.
बघा व्हिडिओ... -