महिलांच्या शौर्याच्या अनेक कहाण्या तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. सध्या तीन महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीची एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॅममध्ये अंघोळ करण्यासाठी गेलेल्या तरूणांचा तीन महिलांनी जीव वाचवला आहे. सेंथमीज सेल्वी (३८), मुथमल (३४) आणि अनंतवल्ली (३४) ही या महिलांची नावं आहेत. तामिळनाडूच्या एका गावातील ४ तरूण कोट्टाराई डॅममध्ये अंघोळ करण्यासाठी गेले असता तोल जाऊन पाण्यात बुडाले. या तरूणांना बुडण्यापासून वाचवण्यासाठी या महिलेनं प्रसंगावधान दाखवत आपली साडी काढून पाण्यात फेकली. त्यानंतर २ तरूणांना वाचवण्यास या महिलांना वाचवण्यात यश आलं आहे.
'न्यू इंडिया एक्सप्रेस' नं दिलेल्या माहितीनुसार ही घटना ६ ऑगस्टला घडली आहे. सिरावानछूर गावातील मुलं कोट्टाराई गावात क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. खेळून झाल्यानंतर ही मुलं कोट्टाराई डॅममध्ये अंघोळ करायला गेले. गेल्या आठवड्यात भरपूर पाऊस पडल्यानं पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पाण्याची पातळी १५ ते २० फुटांपर्यंत पोहोचली होती. हा डॅम Marudaiyaru नदीवर तयार करण्यात आला आहे.
सेंथमीज सेल्वी या महिलेन दिलेल्या माहितीनुसार, ''जेव्हा ती मुलं त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. या मुलांना अंघोळीला जाताना पाहून आम्ही पाणी खोल असल्याचा इशारासुद्धा दिला होता. पण तरीही पाण्यात उतरल्यानंतर चौघांचा तोल गेल्यानं पाण्यात बुडायची वेळ आली. हे दृश्य पाहून मी जराही वेळ न घालवता अंगावरची साडी काढून पाण्यात फेकली. वेळीच पाण्यात साड्या फेकल्यानं चारपैकी दोन तरूणांना वाचवण्यास यश आलं. पण त्यातील दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने खूप वाईट वाटते.''
पुढे त्यांनी सांगितले की, ''पाण्यात बुडालेल्या दोन मुलांना शोधण्यासाठी आम्ही पाण्यात गेलो पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पाण्यात शोधूनही ही दोन मुलं सापडली नाहीत.'' ज्या दोन तरूणांना वाचवलं त्यातील एकाचं नाव कार्तिक आणि दुसऱ्याचं सेंथिवेलन आहे. ज्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला त्यापैकी एका तरूणाचे पविथ्रन आहे. पविथ्रनचं वय १७ वर्षे होतं. तर मृत्यू झालेला दुसरा तरूण २५ वर्षीय असून एक शिकाऊ डॉक्टर होता. याचं नाव रंजीथ होते. आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर या दोन्ही तरूणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
हे पण वाचा :
घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!
शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो
याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल