विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नातं अनमोल आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हि़डीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थिनी तिच्या शिक्षिकेवर हल्ला केला आहे. शिक्षिकेने फोन हिसकावून घेतल्यावर विद्यार्थिनीने तिला चपलेने मारायला सुरुवात केली. हा व्हि़डीओ पाहिल्यावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
आंध्र प्रदेशातील रघु इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. एक विद्यार्थिनी आणि शिक्षिकेमध्ये मोबाईलवरून भांडण झालं. यानंतर शिक्षिकेने मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे विद्यार्थिनीला आणखी राग आला आणि तिने मॅडमवर चपलेने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओच्या सुरुवातीला एका शिक्षिका आणि मुलीमध्ये वाद सुरू आहे. हळूहळू दोघींमधील वाद इतका वाढतो की विद्यार्थिनी शिक्षिकेकडे बोट दाखवून मोठमोठ्याने भांडू लागते. मग ती सर्वात आधी तिची चप्पल काढते आणि शिक्षिकेला धमकावते आणि तिच्यावर हल्ला करते. ज्यामुळे परिस्थिती बिघडू लागतात.
शिक्षिका देखील तिच्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते, पण यामध्ये तिला अनेकदा मार बसतो. ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील रघु कॉलेजमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.