नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. अशात एका शाळेतील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे (School video viral). या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण थक्क झाले आहेत. व्हिडीओ पाहून तसं तुम्हाला हसू येईल पण बॉस अशी शाळा आपल्यालाही हवी होती, असे शिक्षक आपल्यालाही हवे होते, किंवा आताही माझी या शाळेत जायची तयारी आहे, असे विचार तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आता असं या व्हिडीओत नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्याची, पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल नाही का? (Unique teaching skill).
एका शाळेच्या वर्गातील हा व्हिडीओ. जिथं लहान लहान मुलं आणि बरेच शिक्षक दिसत आहेत. आता हा व्हिडीओ चर्चेत येण्याचं कारण म्हणजे इथं शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत. तसं प्रत्येक शाळेची, शिक्षकाची शिकवण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही शिक्षक तर इतक्या वेगळ्या पद्धतीने शिकवतात ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. अशाच शिक्षकांपैकी हा एक शिक्षक. ज्याच्या शिकवण्याच्या हटके शैलीमुळे तो फेमस झाला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या घोळक्यात असलेला एक शिक्षक नाचताना दिसत आहे (Teachers Dancing Video). आता हा शिक्षक विद्यार्थ्यांना नाच शिकवत नाही आहे, तर चक्क मात्रेचे धडे देत आहे. नाचून नाचून तो विद्यार्थ्यांना मात्र शिकवतो आहे (Funny Video Of Teachers Dancing ).
तसं तुमच्यापैकी बहुतेकांनी लहानपणी गाण्यात पाढे म्हणजे अंक म्हटले असतील. त्याचीही आठवण तुम्हाला हा व्हिडीओ पाहताना नक्की आली असावी. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे हे माहिती नाही. memecentral.teb इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो पोस्ट करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही पद्धत देशाबाहेर जायला नको, असं मजेशीर कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे. यावर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. बहुतेकांनी या शिक्षकाचं कौतुक केलं आहे.