एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात गुरुचं स्थान काय असतं हे वेगळं सांगायला नको. गुरु म्हणजे परमेश्वर. पण सध्याच्या काळात गुरुचे स्थान असलेल्या शिक्षकांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय अशी टीका केली जाते. त्यातही शासकीय शाळांमधील शिक्षकांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. सध्या याचाच प्रत्यय देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन तुमचा संताप अनावर होईल.
तुम्ही व्हिडिओमध्ये शासकीय शाळेतील शिक्षिकेचा थाट बघु शकता. या शिक्षिका अगदी आरामात झोपल्या आहेत. त्यांच्या दिमतीला शाळेतील विद्यार्थीच हजर आहेत. एक विद्यार्थीनी त्या शिक्षिकेला पंख्याने हवा घालायचं काम करतेय. पण आरामात झोपलेल्या शिक्षिकेला या गोष्टीची अजिबात कल्पना नाही की तीचं हे कृत्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं जातं आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला संताप येईल. तुमच्याही मनात हाच विचार येईल की अशा शिक्षकांमुळे शिक्षकी पेशाचं नाव बदनाम होत आहे. शाळेत ज्ञानार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्याना कामाला लावुन त्यांना न शिकवता आराम करणाऱ्या शिक्षिकेला काय म्हणावे. हा व्हिडिओ बिहार येथील बेतिया गावातील शासकीय शाळेचा असल्याचे म्हटले जात आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात टाकुन ही शिक्षिका स्वत: मात्र झोपली आहे.