हृदयावर आतापर्यंत अनेक गाणी लिहिण्यात आली आहे. हाताच्या बोटावर मोजली सुद्धा जाऊ शकत नाहीत इतकी गाणी लिहिण्यात आली आहेत. सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही शिक्षिका ह्यूमन हार्टबद्दल मुलांना शिकवत आहे. यावेळी शिक्षिकेनं हृदय आणि प्रेमाचा काहीही संबंध नाही असे सांगितले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयाचे काम फक्त ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची अदलाबदल करण्याचे आहे. याव्यतिरिक्त हृदयाचे कोणतेही काम नाही. विनाकारण आपण हृदयाला वेगवेगळया भावनांसाठी दोषी ठरवत असतो असंही त्या म्हणाल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ मेडिकल स्टूडेंट्स डायरिज नावाच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, हृदयाचे खरे कार्य हे आहे. हृदयाच्या कार्याबद्दल ही शिक्षिका सांगत असताना व्हिडीओची सुरूवात होते. आपल्या मुद्यावरून विषयांतर करून या बाई प्रेमाबद्दल आपलं मत मांडतात. आतापर्यंत ४ हजारापेक्षा जास्त लोकांना या व्हिडीओला लाईक केलं आहे. अरेरे! माय-लेकीला झाला कोरोना; उपचारादरम्यान आईनं जगाचा निरोप घेतला; अन् लेक म्हणाली...
शिक्षिकेनं दिलेल्या माहितीनुसार हृदयाचे काम फक्त ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची अदलाबदल करण्याचे आहे. गाण्यांमध्ये उगाच हृदयाबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. हृदयापासून प्रेम करणं असं काही नसतं. प्रेम, राग या सगळ्या भावना हार्मेन्सवर अवलंबून असतात. जर तुम्ही कोणाचा द्वेष करत असाल तर ते ही हार्मोन्सचं काम आहे. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याला म्हणतात भक्ती! मंदिरासमोर मारुतीरायाला अखेरचं दंडवत घातलं अन् वानरानं सोडले प्राण