तेलंगणातील रहिवासी असलेले आसिफ गरिबांसाठी देवदूतापेक्षा कमी नाहीत. त्यांच्यामते भूकेला कोणताही धर्म नसतो. म्हणूनच गेल्या दहा वर्षांपासून भूकेलेल्यांना आणि गरिबांना मोफत अन्न पूरवत आहेत. माध्यमांनी दिलेल्या रिपोर्ट्नुसार आपली १० वर्षांची मुलगी आणि पत्नीच्या आठवणीत हा माणूस गोरगरिबांना अन्न पूरवण्याचे काम करत आहे. सोशल मीडियावर आसिफ यांच्या कामावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तेलंगणातील रहिवासी असलेले आसिफ यांनी वृत्तसंस्था एनएनआयला दिलेल्या माहितीनुसार गेल्या १० वर्षांपासून गरिब आणि गरजवंत लोकांना मोफत जेवण पुरूवण्याचे काम सुरू ठेवले आहे. आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त लोकांनी या पोस्टवर लाईक्स केले असून सोशल मीडिया युजर्सनी या माणसाच्या कामाबद्दल कौतुकाचा वर्षाव केला आहे. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता जेवण घेण्यासाठी लोकांनी रांग लावली असून जेवण मिळाल्यानंतर आनंदी होऊन ते लोक जेवण घेऊन जात आहेत.
४० वर्षांपासून गोरगरिबांना मोफत अन्न पुरवताहेत ७२ वर्षीय आजोबा
गुजरातच्या मोरबी शहारात राहत असलेले आजोबा गेल्या ४० वर्षांपासून भूकेलेल्यांना अन्न पूरवण्याचे काम करत आहेत. या आजोबांच्या ढाब्याचे नाव 'बचुदादा का ढाबा' असे आहे. ४० रुपयात पोट भरून जेवण देण्याचे काम या ढाब्याच्या माध्यमातून केलं जातं. या ढाब्याची खासियत अशी की, ज्या लोकांकडे जेवणासाठी ४० रुपये किंवा १० -२० रुपयेसुद्धा नसतात. त्यांना या ठिकाणी मोफत अन्न दिलं जातं.
७२ वर्षांचे आजोबा गेल्या ४० वर्षांपासून मोरबी शहरात राहत आहेत. या आजोबांच्या ढाब्यावर पूर्ण थाळीचे ४० रुपये असले तरी १० ते २० रूपयांमध्ये लोकांना या ठिकाणी जेवण उपलब्ध होतं. जर एखाद्या गरिबाकडे तेव्हढेही पैसे नसतील तर हे आजोबा मोफत जेवण देतात. या ढाब्याच्या जेवणात भाजी, चपाती, डाळ, भात, ताक असते. ढाब्याच्या आजूबाजूला अनेक गरिब लोक राहतात. त्या ठिकाणी १० ते १५ लोक नेहमीच जेवणासाठी येतात.
नादच खुळा! गोष्टीतला नाही तर खराखुरा चतूर कावळा; पाहा तहानलेल्या कावळ्याचा व्हिडीओ
आजोबांच्यामते यांच्या ढाब्यावरून कोणीही उपाशी जायला नको. यासाठी ते मोफत जेवण द्यायलाही तयार असतात. १० महिन्यांपूर्वी या आजोबांच्या पत्नीचे निधन झाले. हे दोघे मिळून ढाबा चालवत होते. आता या हे आजोबा एकटेच हा ढाबा चालवत आहेत. त्यांना एक मुलगी असून सध्या ती तिच्या सासरी असते. त्यामुळे आजोबांवर एकटं राहण्याची वेळ आली आहे.
बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....