कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन म्हणजे सीपीआर, रूग्ण किंवा बेशुद्ध व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी सीपीआर एक महत्वपूर्ण पद्धत आहे. याच सीपीआर पद्धतीने नुकताच एका हत्तीच्या पिल्लांचा जीव वाचवण्यात आला. ही घटना आहे थायलॅंडची. हत्तीच्या पिल्लाचा अपघात झाला होता. ज्यानंतर रेस्क्यू करणाऱ्या एका व्यक्तीने हत्तीच्या पिल्लाला सीपीआर दिला आणि त्याचा जीव वाचवला.
आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. द गार्डियनच्या वृत्तानुसार, जी व्यक्ती या व्हिडीओत हत्तीच्या पिल्लाला सीपीआर देत आहे त्याचं नाव Mana Srivate आहे. ही घटना Chanthaburi ची आहे. हत्तीचं पिल्लू रस्ता क्रॉस करत होतं इतक्यात मोटारसायकलने त्याल धडक दिली आणि त्याचा श्वास थांबला.
या रस्त्याने रोड ट्रिपवर Srivate जात होते. ते गेल्या २६ वर्षांपासून रेस्क्यूचं काम करत आहेत. जेव्हा त्यांना हे हत्तीचं पिल्लू असं आढळलं तर त्यांनी लगेच त्याला सीपीआर देणं सुरू केलं. तेव्हा त्याचा जीव वाचला. बाइक चालवणाऱ्या व्यक्तीलाही काही जखमा झाल्या आहेत. लवकरच या पिल्लाला त्याच्या आईजवळ पाठवलं जाईल. सध्या त्याच्याव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.