सध्याच्या पगारवाढीच्या काळात अनेकदा अपेक्षा पूर्ण न झाल्याने सहकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे तुम्ही ऐकले असेल. नेहमी कर्मचारी राजीनामा देताना सामान्य फॉर्मल पद्धतीने लेटर बनवतात. त्यात ऑफिसनं आतापर्यंत काय काय दिले, काय शिकायला मिळाले. इथून नवीन सुरुवात करतोय असं वाचायला मिळते. परंतु सोशल मीडियात एक असं रेजिग्नेशन लेटर व्हायरल झालं आहे ज्यात एका कर्मचाऱ्याने जास्त बकवास न करता थेट शब्दात राजीनामा लिहिला आणि कंपनीला रामराम ठोकला.
या कर्मचाऱ्याचे लेटर पाहून नेटिझन्सला हसू आवरेना तर कर्मचाऱ्याचे राजीनामा पत्र पाहून बॉसला ते आयुष्यभर आठवणीत राहील हे नक्की. या कर्मचाऱ्याने केवळ ३ शब्दात राजीनामा दिला जे वाचून या कर्मचाऱ्याला कंपनी सोडताना किती आनंद झालाय हे बॉसच्या लक्षात येईल. या कर्मचाऱ्याने पत्रात बाय बाय सर, त्याशिवाय काहीच लिहिले नाही. इतक्या कमी शब्दात आतापर्यंत कुणी राजीनामा दिला नसेल. कर्मचाऱ्याने हे ३ शब्द लिहिलेले पत्र थेट बॉसच्या हातात सोपवले.
इतकी सहज पद्धत दुसरी नसेलहे लेटर एका ट्विटर युजरने शेअर करत त्यात कॅप्शन म्हणून Simple असं लिहिलं आहे. या ट्विटला ३ लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स केले तर ५१ हजार लोकांनी रिट्विट केले होते. हजारो लोकांनी ही पोस्ट वाचून कमेंट्सही केल्या आहेत. असा राजीनामा आजपर्यंत कधीच वाचला नाही असं नेटिझन्स म्हणाले. तर असा राजीनामा केवळ महान व्यक्तीच देऊ शकतात असं काहींनी म्हटलं.