शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

Optical Illusion: या फोटोत तुम्हाला सर्वप्रथम जे चित्र दिसेल ते सांगेल तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 1:53 PM

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला सर्वात आधी जे चित्र दिसेल त्यावरुन तुमचं व्यक्तिमत्त्व ठरणार आहे.

सोशल मीडियावर असे बरेच फोटो व्हायरल होत असतात (Opticall illusion photos) जे पाहून तुम्ही कन्फ्युझ होता. काही फोटो विचित्र आकार असतो किंवा विचित्र डिझाइन असते. ज्यामध्ये काही ना काही दडलेलं असतं. याला ऑप्टिकल इल्युझन असं म्हणतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला सर्वात आधी जे चित्र दिसेल त्यावरुन तुमचं व्यक्तिमत्त्व ठरणार आहे.

Heart.co.uk च्या माहितीनुसार, Christo Dagorov नावाच्या आर्टिस्टने हे पेन्सिल स्केच काढले आहे. या चित्रात प्रत्येक व्यक्तीला वेग- वेगळ्या प्रतिमा दिसतात. या चित्रात प्रत्येकाला काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे. झाड, मुळे की ओठ? तुम्ही जे पाहता त्यावरुन तुमच्या व्यक्तिमत्त्व ठरते.

झाडेजर तुम्हाला या चित्रात झाडे दिसली तर तुम्ही आत्मविश्वासू तर आहातच पण तितकेच उत्साही देखील आहात. यासोबत तुम्हाला लोकांमध्ये मिळूनमिसळून राहायला आवडते. तुम्ही इतरांच्या मतांचा आदर करता. तसेच लोकांचे तुमच्याविषयी काय मत आहे, याचा विचारही तुम्ही नक्कीच करता. विनयशीलता हा तुमचा खास गुण आहे. पण त्याचसोबत तुमचे व्यक्तीमत्त्व काहीसे गुढ आहे. एखाद्या परिस्थीतीत तुम्ही काय निर्णय घ्याल याबद्दल अंदाज बांधने इतरांना कठीण जाते. याचाच अर्थ तुमच्या भावना लपवण्यामध्ये तुम्ही माहिर आहात. जरी तुमचे खूप मित्र असले तरी देखील तुम्ही निवडक लोकांनाच जवळच्या व्यक्तींचा दर्जा देता.

मुळेजर तुम्ही या फोटोत झाडाची मुळे पाहिलीत याचा अर्थ तुम्ही लाजाळू आहात. तुम्हाला एकांतात राहणे आवडते. तुम्ही तुमच्यावरील टीका अभ्यासपूर्ण असेल तर नक्कीच स्वीकारता. तुमच्या परिश्रमातून तुम्ही तुमच्या आजुबाजुच्या लोकांना प्रेरित करता. तुमचा स्वभाव सौम्य असून काहीवेळा तुमचा आत्मविश्वास कमी पडू शकतो. अनेकदा तुम्ही हट्टी आणि जिद्दी स्वभावाचे असता. तुम्ही ज्या लोकांना पहिल्यांदा भेटता त्यांना सुरुवातीला तुम्ही सर्वसामान्य वाटता. तुमच्यात कोणतेही टॅलेन्ट आणि क्रांतीकारी विचारसरणी असेल असे तुम्हाला वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही त्या लोकांसोबत वेळ घालवता तेव्हा ते तुमच्यातील उत्साह बघुन चकित होतात.

ओठजर तुम्ही ओठ दिसले, तर तुम्चा स्वभाव शांत आहे. जीवनातील ड्राम्यापासून तुम्हाला लांब रहायला आवडते. तुम्हाला गराड्यापासून दूर राहुन तुम्हाला मध्यवर्ती आयुष्य जगायला आवडते. तसेच तुम्हाला शांतपणे प्रवाहासोबत राहायला आवडते. आयुष्याच्या गुंतागूंतीत आणि परफेक्शनच्या भानगडीत तुम्ही अजिबात पडत नाही. तुम्ही हुशार आणि प्रामाणिक जरी दिसत असला तरी लोक तुम्हाला काहीवेळा कमकुवत आणि गरजू समजतात. पण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या आयुष्यातले प्रश्न सोडवण्यात अत्यंत माहिर असता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके