गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो फार जुना असून यात भारतीय वायुसेनेचे ५ पायलट मोटारसायकलवर बसून पोज देत आहेत. हा फोटो १९६६ मधील आहे आणि हा फोटो अजिबात सामान्य नाहीये.
हा फोटो काही दिवसांपूर्वी Reddit आणि Twitter वर खूप बघितला गेला आणि शेअर केला गेला. या फोटोचा ५३ वर्ष जुना इतिहास आहे. हा फोटो ट्विटरवर महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. या फोटोत दिसणारे पायलट हे 'Hell's Angel's' ग्रुपचे आहेत.
खास बाब म्हणजे म्हणजे या पायलट्सनी ५३ वर्षांनंतर २०१९ मध्ये पुन्हा तसाच फोटो काढला. पण यात नव्या फोटोमध्ये केवळ ४ पायलट दिसत आहेत. आनंद महिंद्रा यांनी हा फोटो शेअर करत विचारले की, 'काय तुम्हाला माहीत आहे या फोटोतील जंटलमन कोण आहेत?'.
Reddit वर एका यूजरने लिहिले की, हा फोटो १९७१ च्या युद्धाच्या आधीचा आहे. पायलट्स जावा मोटारसायकलवर बसले आहेत. या पायलट्सनी त्यावेळी पाकिस्तानवरून विमान उडवले होते आणि लढाई लढली होती. असे सांगितले जात आहे की, जावा मोटारसायकलने रिलॉन्च केलं आहे. त्यामुळे या ऐतिहासिक फोटोला पुन्हा रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. कंपनीनेच चारही पायलट्सचा शोध घेतला आणि हा नवा फोटो क्लिक केला.
ट्विटरवरही एका यूजरने फोटोबाबतचा एक किस्सा शेअर करत सांगितले की, या ऐतिहासिक पायलट्सच्या ग्रुपला 'Hell's Angel's' नाव देण्यात आलं होतं.