Elon musk एलॉन मस्क ने ट्विटर खरेदी केल्यानंतर रोज ट्विटर कार्यप्रणालीसंदर्भात नवीन नवीन माहिती समोर येत आहे. मस्क यांचा मनमानी कारभार, शेकडो जणांना राजीनामा द्यायला लावणे, भारतीयांना कामावरुन काढून टाकले यामुळे मस्क नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. ट्विटर ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी १२ तास काम करायचे असा फतवाच मस्कने काढल्यावर त्यांना रोषाला सामोरे जावे लागले, मात्र यामुळे मस्क यांना काहीच फरक पडताना दिसत नाहीए.
Orkut नेटकऱ्यांना आली ओर्कुटची आठवण
एलॉन मस्क यांच्या अशा वागण्यामुळे आता अनेक ट्विटरचे कर्मचारी स्वत:हुनच राजीनामा देत आहेत. तर दुसरीकडे नेटकऱ्यांना पुन्हा Orkut ओर्कुटची आठवण येत आहे. ओर्कुटशी नेटकऱ्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. मात्र ओर्कुट बंद झाल्यानंतर अनेक पर्याय आले आणि ओर्कुटचा विसर पडला. ओर्कुट बुयुकोकटेन यांना २००४ साली ओर्कुट ही साईट सुरु केली. गुगल ही साईट ऑपरेट करत होती. फेसबुकच्या आधी ओर्कुट हेच तरुणांसाठी चॅटिंगचे साधन होते. ओर्कुट बंद झाल्यानंतर नेटकऱ्यांना चांगलेच दु:ख झाले होते. आता ओर्कुट पुन्हा सुरु करा अशी मागणी नेटकरी करत आहेत. तर ट्विटरवरच #ORKUT ट्रेंडिंग होत आहे.
...तर ट्विटर बंद होईल
नुकतेच ट्विटरमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी राजीनामा देत आहेत. 'तासनतास काम करा नाहीतर निघा' अशी मस्क यांनी घोषणा केल्याने कर्मचारी नाराज झाले. अशा वातावरणात काम नको म्हणून राजीनामा देणे सुरु झाले. यावर नेटकऱ्यांनी अशाने ट्विटर बंद व्हायला वेळ लागणार नाही अशा प्रतिक्रिया दिल्या. तर यावरही मस्क यांना फरक पडलेला नाही. चांगले काम करणारे थांबत आहेत त्यामुळे मला काळजी नाही असे मस्क यांनी एका नेटकऱ्याला ट्विट केले.
नेटकरी आणि एलॉन मस्क मध्ये ट्विटरवरच जुंपली
नेटकरी ट्विटरवर करत असलेल्या टीकेवर एलॉन मस्कही थेट उत्तरे देत आहेत. त्यामुळे ट्विटरवरुन युझर्स आणि एलॉन मस्क यांच्यात चांगलीच जुंपली आहे. तुमच्या ट्विट करण्याने तर ट्विटरचा वापर अजुनच वाढतोय असे म्हणत मस्कने नेटकऱ्यांनाच डिवचले आहे.