सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) असलेले फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो कधी आश्चर्यकारक तर कधी हैराण करणारे असतात. कधी कधी तर आपण काय बघतोय यावरच आपला विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लोकांना त्यांच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाहीये.
या ऑप्टिकल इल्यूजनच्या व्हिडीओत जे काही दिसतं त्याला ट्रॉक्सलर्स फेडिंग असं म्हणतात. व्हिडीओत दिसणाऱ्या ग्रे कलरच्या सर्कल्सकडे तुम्ही ३० सेकंद बघाल तर तुम्हाला जाणवेल की, इतर सर्कल्सचा कलर आपोआप हिरवा होत आहे. पण जसे तुम्ही मधल्या प्लसच्या साइनकडे बघाल तर त्याच्या बाजूचे सर्कल आपोआप गायब होतात.
पण हे शक्य कसं झालं? चला तर जाणून घेऊ. एक स्विस वैज्ञानिक आणि फिलॉसॉफर पॉल ट्रॉक्सल यांनी अनेक वर्षांपूर्वी आपल्या रिसर्चमधून शोधलं की, मेंदू अशा व्हिज्युअल्सला इग्नोर करतो जे बदलत नाहीत. त्यांनी १८०४ मध्ये या गोष्टी शोध लावला होता की, जर तुम्ही एखाद्या एलिमेंटवर आपली नजर टिकवून ठेवाल तर तुमचा मेंदू इतर वस्तूंना डोळ्यांसमोर धुसर करतो किंवा पूर्णपणे गायब करतो. हे ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या व्हिज्युअल पर्सेप्शनवर प्रभाव टाकण्याचं काम करतं.
तसे तर सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटोज आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसांआधी अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्वायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसने आपली वेबसाइट इन्वायर्नमेंट किड्स हेल्थवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटोही फार गाजला होता.