सिंह...जंगलाचा राजा... ज्याच्यासमोर कोणत्याच प्राण्याचं काहीच चालत नाही. एकदा का त्याने शिकारीचा पाठलाग केला की त्याला आपलं भक्ष्य बनवतोच. भल्याभल्या प्राण्यांची शिकार करणारा हा सिंह एका छोट्याशा कासवासमोर मात्र फेल ठरला आहे. तीन-तीन सिंह एका साध्या कासवाची शिकार करू शकले नाहीत.
कासव आणि सिंहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नदी किनारी सिंह एका कासवाला पकडतो. सिंहाच्या तावडीत सापडूनही कासव घाबरत नाही, हार मानत नाही तर हुशारीने काम घेतो. ज्यामुळे इतके प्रयत्न करूनही सिंह काही त्याची शिकार करू शकत नाही.(Lion turtle video)
व्हिडीओत पाहू शकता सिंह कासवावर आपल्या पंज्यानी मारताना दिसतो आहे. कासवाने आपलं तोंड आपल्या टणक कवचाच्या आत लपवलं आहे. सिंह त्याला पलटण्याचाही प्रयत्न करतो पण कासव काही त्याच्याने पलटत नाही. कासव स्वतःला वाचवण्यासाछी पूरेपूर प्रयत्न करतो. अखेर सिंह थकतो आणि त्या कासवापासून जाऊन दूर होतो.
यानंतर दुसरा सिंह येतो तोसुद्धा त्या कासवाची शिकार कऱण्याचा प्रयत्न करतो पण त्यालाही यात यश मिळत नाही. अखेर तिसरा सिंह येतो. तो या कासवाला आपल्या जबड्यात धरतो. कासवाला आपल्या तोंडात धरून काही वेळ तो असाच फिरतो. पण कासव तरी काहीच हालचाल करत नाही. पण सिंह त्याला आपल्या तोंडातून बाहेर काढून जमिनीवर ठेवतो आणि शांत बसतो.
तिन्ही सिंह कासवाची शिकार करण्याचा प्रयत्न करून शकतात आणि शांत बसतात. तेव्हा संधी साधून कासव हळूहळू नदीच्या दिशेने जातो आणि तीन-तीन सिंहांच्या तावडीतून सुटून आपला जीव वाचवतो.
AlphaNews ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ गिर जंगलातील आहे. आज तकच्या वृत्तानुसार गिर जंगलाचे मुख्य अधिकारी डॉ. मोहन राम यांनी सांगितलं की जेव्हा ते जंगलात फिरत होते तेव्हा त्यांना तीन सिंह फिरताना दिसले. एका सिंहिणीचं लक्ष पाण्याबाहेर आलेल्या या कासवावर गेलं. सिंहिणी त्या कासवाला बराच वेळ पाहत होती नंतर त्याच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. पण तिला काही यात यश मिळालं नाही. कासवाने आपला जीव वाचवण्यासाठी आपलं तोंड आणि पाय शरीराच्या आत लपवले आणि तो वाचला.