कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान माणसं सध्या घरी असली तरी मुकी जनावरं मात्र मुक्त संचार करताना दिसून येत आहेत. अलिकडे सोशल मीडियावर वाघ, बिबट्या इतर वन्य प्राण्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या असाच एका वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरवर काही शेतकरी बसले आहेत. या शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला केला आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांनी आपला जीव वाचवला. वाघाने केलेल्या या हल्ल्यामुळे तीन लोक जखमी सुद्धा झाले आहेत. हा व्हिडीयो एएनआयने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.(हे पण वाचा-Video : लॉकडाऊनमध्ये माणसं घरात अन् वाघ आपल्या कुटुंबासह थेट तलावात)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. घटनास्थळी वनविभाागाचे अधिकारी पोहोचले होते. लोकांनी या व्हिडीयोवर अनेक कमेंट्स दिल्या आहेत. 'एक था टायगर' अशी कमेंट एका ट्विटर युजरने दिली आहे. या व्हिडीओतील वाघाची झेप थरकाप उडवणारी आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असताना एकिकडे प्राण्यांचा वाढलेला मुक्त संचार आणि माणसांवर होणारे हल्ले चिंतेची बाब ठरत आहेत. (हे पण वाचा-CoronaVirus News : मुक्या जनावरांना समजलं; माणसांना कधी कळणार? फोटो झाला व्हायरल)