(Image credit- Science alert)
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तुम्ही जंगलातील वन्य जीवांचे किंवा प्राण्यांनी माणसांवर केलेल्या आक्रमणाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लॉकडाऊनमध्ये माणसं आपापल्या घरात बंद असल्याने प्राण्याचा मुक्त संचार सुरू होता. प्राण्याची वेगवेगळी दृश्य या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाली. सोशल मीडियावर सध्या एका वाघाचा व्हिडीयो खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. एक वाघ अचानक घरात घुसताना या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल. गावातील लोक या वाघाला पाहून सुरुवातीला खूप घाबरले. मग लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक वाघ घरातून बाहेर येतो. नंतर शेजारच्या घरात प्रवेश करतो. वाघाला पाहून लोक पळताना दिसून येतील. ४ सेकंदाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तर एका युजरने हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले आहे.
सुशांत नंदा यांनी हा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले की, आत्तापर्यंत आपण सिंहाने लोकांना त्रास देताना पाहिले असेल. पण इथे मात्र वाघानेच लोकांना घाबरवलं आणि गावात घुसला आहे. हा व्हिडीओ भारताच्या एका गावातील आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ८० लाईक्स आणि २० रिट्विट्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ २२ जूनला सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय कुतुब मीनारपेक्षाही 4 पटीने मोठा उल्कापिंड, केवळ दोन दिवस...
"आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"