शहरं
Join us  
Trending Stories
1
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
2
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
3
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
4
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
5
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
6
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
7
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
8
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
9
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
10
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
11
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
12
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
13
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
14
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
15
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
16
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
17
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
18
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
19
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
20
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान

दबा धरुन बसलेला वाघ म्हशीच्या मागे असा काही लागला की Video पाहुन अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 2:48 PM

अनेकदा शिकारीचे असे व्हिडिओ समोर येतात, जे हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. मात्र आज तो प्रोफेशनल किंवा खासगी आयुष्यामुळे नाही तर एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे, जो त्याने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram Video) अकाऊंटवरुन शेअर केला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जंगलाच्या दुनियेत प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी शिकारीवरच अवलंबून राहावं लागतं. अनेकदा शिकारीचे असे व्हिडिओ समोर येतात, जे हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video of Tiger and Buffalo Fight) पाहायला मिळतं, की म्हशीला आपली शिकार बनवण्यासाठी वाघ तिच्यावर नजर ठेवून आहे. संधी मिळताच हा वाघ शिकारीच्या मागे धावू लागतो. पाहता पाहता दोघांमध्ये जणू पकडापकडीचा खेळ सुरू होतो. वाघ शिकारीसाठी म्हशीच्या मागे धावताना दिसतो, तर म्हैसही आपला जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत घेऊन पळताना दिसते. मात्र काहीच वेळात दोघेही कॅमेऱ्यात दिसायचे बंद होतात.

हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हाच तर जंगलाचा नियम आहे. इथे कधी काय घडेल हे सांगता येत नाही. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, दोघांचा हा पकडापकडीचा खेळ अतिशय मजेशीर आहे. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

आतापर्यंत हा व्हिडिओ १ लाख ८७ हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. काहीच तासात या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. रणदीप हुड्डाने हा व्हिडिओ शेअऱ करत कॅप्शनमध्ये लिहिलं, माझा पहिला टायगर हंट. या व्हिडिओवर आता नेटकरीही भरपूर कमेंट करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाRandeep Hoodaरणदीप हुडाInstagramइन्स्टाग्रामTigerवाघ