सोशल मीडियावर वाईल्डलाईफ व्हिडीओंना खूप पसंती मिळते. अलिकडे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. ऐरवी माणसांना घाबरून लपत असलेल्या प्राण्यांचा मुक्त संचार लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदाच अनेकांना पाहायला मिळायला. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत.
या व्हिडीओमध्ये वाघांची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वाघीणीसाठी या वाघांमध्ये लढाई झाली. हा व्हिडीओ साऊथ आफ्रिकेतील टाइगर कॅनियन येथील आहे. यूट्यूबवर हा व्हिडीओ 2013 मध्ये शेअर करण्यात आला होता. आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वाघ दुसऱ्या वाघाच्या दिशेने धावत आला आणि हवेत उडी मारून वाघावर अटॅक केला आहे. पण दुसऱ्या वाघाने जेव्हा पलटवार केला तेव्हा या दोघांमध्ये बराचवेळ लढाई सुरू होती. त्यानंतर एक वाघिण सुद्धा त्या ठिकाणी आली. दूर उभं राहून ही वाघीण या वाघांची लढाई पाहत होती.
सुधा रमन यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, तुम्ही कधी वाघांना लढताना पाहिले आहे का? ही लढाई कुस्तीपेक्षा कमी नाहीcत्यानंतर नवीन घरं शोधण्यासाठी बाहेर जावं लागतं. सुधा रमना यांनी हा व्हिडीयो 10 जुलैला शेअर केला त्यानंतर त्या व्हिडीओला हजारापेक्षा व्हिव्हज तर 100 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पहिल्यांदाच कोरोनाचं 'असं' रुप आलं समोर; ४ वेळा महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली; अन् मग...
'या' रिपोर्टने नक्कीच तुमची झोप उडेल; कोरोना चाचणीची आवश्यकता का? जाणून घ्या