टिकटॉक व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नादात या मुलाला आपली नोकरी गमवावी लागली आहे. या मुलीने टिकटॉक व्हिडीओमधून प्रसिद्ध फूड चेन पनेरा ब्रेडचा पडदाफाश केला आहे. मुलीने व्हिडीओ मार्फत सांगितलं की, रेस्टॉरंटमध्ये चीझी मॅकरॉनी कशी तयार केली जाते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मुलीला नोकरीवरून काढून टाकलं आहे.
मुलीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट केलं आहे की, याच व्हिडीओमुळे मला जॉबवरून काढून टाकलं आहे.' या महिलेचं नाव ब्रियाना रामिरेज आहे. उबरने हा व्हिडीओ ट्विट केला असून सांगितलं की, अशा पद्धतीने तयार केली जाते मॅकरोनी चीझ तयार केलं जातं. यावर रिप्लाय देत ब्रियानाने ट्विट केलं होतं.
18 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ब्रियाना पनेरा किचनमध्ये उभी आहे आणि मॅकरोनी चीझचं एक फ्रोजन पॅकेट उचलते आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकते. काही वेळाने ती एक बॅग खोलून प्लेटमध्ये सर्व्ह करते. काही सेकंदामध्ये तयार झालेल्या या मॅकरोनीला सर्व केल्यानंतर ती थम्स अप करते आणि म्हणते, चटकन तयार झालेलं मॅकरोनी तयार आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कंपनीला फार नावं ठेवत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, 'मी मॅकरोनी चीझ एकदा खाल्लं होतं. त्यानंतर माझ्या घशात प्लास्टिकचा तुकडा अडकला होता. मी आता खात्रीने सांगू शकते की, हा मॅकरोनीच्या बॅगेचा तुकडा होता.'
ब्रियानाने सांगितले की, लोक न्यूज चॅनलवर व्हिडीओ पाहिल्यानंतर मला नोकरीवरून काढलं. लोकं ब्रियानाचं कौतुक करत आहेत.