रस्त्यावर कचरा फेकू नका याबाबत वेगवेगळ्या जाहिराती केल्या जातात. पण लोकांची सवय काही केल्या मोडत नाही. पण त्यांना नकळतपणे कुणीना कुणी कसातरी धडा शिकवून जातात. आता हेच बघा ना चीनमधील एका चिमुकल्याने एका वयक्त व्यक्तीला हे शिकवलं की, कचऱ्याची जागा कचरा पेटीत असते रस्त्यावर नाही. या हुशार चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्याचं Sun Jiarui असून तो चीनमधील शेडोंग प्रांतातील जीनिंग शहरात राहतो.
व्हिडीओत बघायला मिळतं की, रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधून एक व्यक्ती रस्त्यावर बॉटल फेकतो. चिमुकला हे पाहतो आणि बॉटल उचलून त्या व्यक्तीकडे परत देतो. हा व्हिडीओ मुलाच्या आईने काढला असून सोशल मीडियात याचं कौतुक केलं जातय. मोठ्यांनी या लहान मुलाकडून शिकावं असा सल्लाही अनेकजण देत आहेत.
लहान मुलाच्या आईने सांगितले की, तिचा एक वर्षीय मुलगा आता चालणं शिकत आहे. अशात जेव्हा आम्ही त्याला घेऊन बाहेर जातो तेव्हा त्याचा व्हिडीओ काढतो. ही घटना नकळतपणे कॅमेरात कैद झाली.
डेली मेलला Jing ने सांगितले की, 'त्या दिवशी त्याला असं वाटलं असेल की, चुकून ड्रायव्हरची बॉटल खाली पडली. म्हणून त्याने ती त्याला उचलून परत दिली. माझा मुलगा फारच हेल्पिंग आहे. तो सध्या केवळ १ वर्ष ३ महिन्यांचा आहे. त्याला सध्याच पर्यावरणाबाबत काही कळत नाही. पण त्याच्या या वागण्यातून ड्रायव्हरला चांगलाच धडा मिळाला आहे'.