Viral Video : आपल्याकडे ट्रॅफिक हा रोजचाच विषय झाला आहे. १० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी ट्रॅफिकमुळे कधी कधी एक तास वेळ लागतो. नुकताच कर्नाटकातील बंगळुरु येथून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओत चक्क रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे दिसत आहे. याबाबत आता रेल्वेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेल्वे फाटकांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी दिसत आहे आणि जवळच ट्रेन थांबवल्याचे दिसतंय. ट्रॅफिकमुळे ट्रेनही जाममध्ये अडकल्याचा दावा करण्यात आला. यानंतर नागरिकांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. बेंगळुरूला ट्रॅफिक जॅमपासून कधी मुक्ती मिळेल, असा सवाल सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केले.
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
या प्रकरणी साउथ रेल्वेचे स्पष्टीकरण आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे ट्रॅफिक जाममध्ये अडकली नाही. तांत्रिक समस्या आल्यामुळे या रेल्वेला मुन्नेकोल्लाला येथील गेटजवळ थांबवण्यात आले होते. तांत्रिक टीम येईपर्यंत ती रेल्वे त्या फाटकाजवळ थांबवण्यात आली होती, यावेळी फाटकाजवळ वाहनांची गर्दी झाली होती त्यामुळे वाहने जाण्यासाठी फाटक उघडण्यात आले होते. व्हिडीओमध्ये दिसणारी ट्रेन यशवंतपूर-कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस होती, तांत्रिक समस्या सोडवल्यानंतर पुन्हा ही रेल्वे तिथून रवाना झाली, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
सोशल मीडियावर रेल्वेला केले ट्रोल
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी रेल्वेलाही ट्रॅफिकमध्ये थांबावे लागले असं सांगितलं. एका नेटकऱ्याने लिहिले की, खरंच? बेंगळुरूमधील वाहतूक इतकी प्रचंड आहे की, एक ट्रेनही जाममध्ये अडकली आहे, शहरातून जाणारा ट्रॅक साफ करण्यासाठी प्रवाशांची वाट पाहत आहे. हा व्हिडीओ आऊटर रिंगरोडजवळील मुन्नेकोलाला रेल्वे फाटकाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
बंगळुरू अनेकदा ट्रॅफिक जाममुळे चर्चेत असते. नुकताच एका नेटकऱ्याने एक्सवर गुगल मॅपचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. आणि एकाच वेळी संपूर्ण शहरात कुठे कुठे ट्रॅफिक जाम होते ते सांगितले.